Sakshidar.co.in : 24 नोव्हेंबर 2021 / संक्षिप्त बातमी अपडेट…

24 नोव्हेंबर / संक्षिप्त बातमी अपडेट…

▪️ एअरटेल पाठोपाठ व्होडाफोन आयडियाने देखील आपल्या प्रिपेड प्लॅनच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

▪️ कंपनी सर्व प्रिपेड प्लॅनची किंमत 20 ते 25 टक्क्यांनी वाढवणार आहे – नवीन दर कसे असतील ,ते आपण पुढे येणाऱ्या मॅसेज मध्ये जाणून घेऊ

▪️ केंद्र सरकार क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. सरकार या हिवाळी अधिवेशनात यावर विध्येयक मांडेल – क्रिप्टोकरन्सीसंदर्भात संसदीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक झाली –

▪️ भारताने क्रिप्टोकरन्सीचे नियमन करण्याची आणि त्याची दिशा ठरवण्याची वेळ आलीय, असे त्या बैठकीत एकमतानं ठरवण्यात आले

▪️ मुंबई आणि परिसरातून लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर – आता UTS या अ‍ॅपच्या माध्यमातून लोकल प्रवासासाठी तिकीट आणि पास सुद्धा मिळणार

▪️ राज्यात मंगळवारी 766 नव्या रुग्णांची नोंद झाली – तर सध्या राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 9 हजार 678 आहे

▪️ पेट्रोलियम तज्ञ नरेंद्र तनेजा यांनी सांगितले , आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरत आहेत – यामुळे लवकरच पेट्रोल डिझेलच्या दरात घट व्हायला सुरवात होईल

▪️ सोयाबीनच्या दरात दिवाळीनंतर सातत्याने वाढ होत आहे , सोयाबीनच्या दर वाढीत सातत्य कायम आहे – सध्या दिवासाला 150 रुपयांची दरवाढ होत आहे

▪️ देशातील बँकांच्या कर्जाची जाणून बुजून , परतफेड न करणाऱ्या थकबाकीदारांकडून प्रत्येक पैसा वसूल केला जाईल- असे मंगळवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितले

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment