0 0
Read Time:3 Minute, 52 Second

अमेरिकेची शक्तीशाली युद्धनौका USS निमित्ज (American Nimitz Class Aircraft Carrier) हिंदी महासागरात झाली दाखल, चीनला दादागिरीला मोठा रणनितीक इशारा

अमेरिकेचे शक्तीशाली विमान वाहू युद्धनौका यूएसएस निमित्ज (American Nimitz Class Aircraft Carrier) अंदमान-निकोबारच्या समुद्रात भारतीय नौदलाच्या युद्धनौकांसोबत कवायती करणार आहे. भारतीय नौदलाचा आणि अमेरिकन नौदलाचा हा सराव म्हणजे दक्षिण चीन सागरापासून पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ दादागिरी करणाऱ्या चीन देशासाठी एक मोठा इशाराच आहे असे म्हणावे लागेल.

अमेरिकेच्या युद्धनौका बाबत –

भारतीय नौदल आणि अमेरिकन नौदल मालाबार आणि अन्य युद्ध सरावाच्या निमित्ताने एकत्र येत असते. आता युद्धनौका यूएसएस निमित्ज (American Nimitz Class Aircraft Carrier) सरावात सहभागी होणार आहे. अण्वस्त्रने सज्ज यूएसएस निमित्ज (American Nimitz Class Aircraft Carrier) सोबत अन्य युद्धनौका सुद्धा आहेत. टाइम्स ऑफ इंडियान नुसार शनिवारी मालाक्का स्ट्रेटमधून त्यांनी हिंदी महासागरात प्रवेश केला. तसेच यूएसएस निमित्ज (American Nimitz Class Aircraft Carrier) आणि यूएसएस रोनाल्ड रेगन (American Ronald Reagan) या दोन युद्धजहाजांची दक्षिण चीन सागरातील तैनातीची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. .
दक्षिण चीन सागरातील मित्र राष्ट्रांच्या मदतीसाठी आणि चीनच्या विस्तारवादी धोरणाला आळा घालण्यासाठी अमेरिकेने यूएसएस निमित्ज (American Nimitz Class Aircraft Carrier) आणि यूएसएस रोनाल्ड रेगन (American Ronald Reagan) या दोन्ही युद्धनौका दक्षिण चीन सागरात तैनात केल्या आहेत. अमेरिकेकडे यूएसएस निमित्ज प्रकारातील एकूण १० जहाजे आहेत. प्रत्येक जहाजाचे वजन सुमारे १ लाख टनच्या घरात असून ८० ते ९० फायटर विमाने एकावेळी जहाजावर तैनात असतात. अमेरिकेने ही अशी जहाजे जगभरात तैनात केली आहेत.

अंदमान-निकोबारमध्ये भारत, अमेरिका व जपान यांचा सराव 

अंदमान-निकोबारमध्ये होणाऱ्या कवायतींमध्ये भारतीय नौदलाच्या डिस्ट्रॉयर, युद्धनौका, टेहळणी नौका फ्रिगेटस, आणि पाणबुडया सहभागी होणार आहेत. अंदमान-निकोबार कमांड आणि विशाखापट्टणम येथील पूर्व नौदल कमांडची जहाजे, फायटर विमाने या कवायतींमध्ये सहभागी होतील. अंदमान-निकोबार देशातील एकमेव थिएटर कमांड आहे, जिथे लष्कर, नौदल, हवाई दल आणि तटरक्षक दल एका ऑपरेशनल कमांडरच्या अंतर्गत येते. भारत आणि अमेरिकेत होणाऱ्या मालाबार कवायतींमध्ये २०१५ पासून जपान सहभागी होत आला आहे. अधिक माहिती म्हणजे मागच्याच महिन्यात मालाक्का स्ट्रेट जवळ भारत आणि जपानच्या युद्धजहाजांनी एकत्रित सराव केला होता. 
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *