0 0
Read Time:9 Minute, 28 Second

तयारी स्पर्धा परीक्षांची || सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज – इतिहासातील काही प्रसिद्ध वक्तव्ये  || History Famous Slogans

सर्व  स्पर्धा परीक्षांचे (Preparation of Competitive Exam in Marathi) प्रश्नांची पद्धत, स्वरूप, दृष्टिकोन बदलला आहे. पीएसआय/ एसटीआयसारख्या परीक्षांसाठी सुद्धा यूपीएससी पॅटर्न चा अवलंब केला जात आहे. एकूणच स्पर्धा वाढली आहे आणि त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा कस चांगलाच लागत आहे, हे मागील तीन – चार  वर्षांतील एमपीएससीच्या विविध परीक्षांचे कटऑफ आणि निकालावरून आपण पहिलेच आहे.
स्पर्धा परीक्षात (Preparation of Competitive Exam in Marathi) झालेले व भविष्यात होत राहणारे बदल, बदलते प्राधान्यक्रम यांच्याशी जुळते घेण्याचा व्यावसायिक दृष्टिकोन उमेदवारांनी अंगीकारणे आवश्यक आहे. त्यामुळेच स्पर्धेत टिकणे शक्य होईल. म्हणूनच ध्येय यूपीएससी असेल किंवा एमपीएससी किंवा इतर विविध स्पर्धा परीक्षा सर्व परीक्षांची माहिती घेऊन अभ्यासाची योजना आखायला हवी असे आम्हास वाटते.

सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज (General Knowledge in Marathi) :: इतिहासातील काही प्रसिद्ध वक्तव्ये || History Famous Slogans

खाली दिलेले इतिहासातील काही प्रसिद्ध वक्तव्ये हे आपणास महाराष्ट्र व केंद्र सरकारच्या विविध विभागातील भरतीसाठी तसेच मुख्य करून एमपीएससी भरती  (MPSC Bharti), युपीएससी भरती (UPSC Recrutitment), रेल्वे भरती  (Railway Recruitment), एलआयसी भरती  (LIC – AAO Recrutitment), बँकिंग भरती  ( Banking Recruitment), स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती (SSC Recrutitment) पोस्ट ऑफिस भरती  (Post office Recruitment), संरक्षण दल भरती (Indian Army Recruitment) व इतर स्पर्धा परीक्षा भरतीसाठी नक्की उपयोगी ठरतील अशी आम्हास आशा आहे.

 इतिहासातील काही प्रसिद्ध वक्तव्ये 

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले
◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन
◾️“हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे” – भारतमंत्री बर्कनहेड
◾️सवामी दयानंदाच्या आर्य समाजाचे ”लढऊ हिंदू धर्म”असे वर्णन- भगिनी निवेदिता
◾️राजा राममोहन राय यांच्या सतीविरोधी लढ्याबद्दल ‘मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक’ असी प्रशांश – बेंथम
◾️“मुर्शिदाबाद हे शहर लंडन शहराइतकेच धनसंपन्न होते” – लॉर्ड क्लाइव्ह
◾️“प्रत्येक वर्षाला कॉंग्रेसचे होणारे तीन दिवसाचे अधिवेशन म्हणजे एक प्रकारचा तमाशाच आहे.” अश्विनीकुमार दत्त.
◾️” भुंकत राहणारे परंतु चावा घेण्यास कचरणारे श्वान किंवा दात नसलेला कागदी वाघ.” असे कॉंग्रेसचे वर्णन – अश्विनीकुमार दत्त.
◾️” कॉंग्रेस हि एक महान रोगाने पछाडलेली संघटना आहे” – अरविंद घोष
◾️” आम्ही आमच्या जोरावर भारताला जिंकून घेतले आहे आणि स्वतःच्या जोरावर तो आमच्या ताब्यात ठेऊ ” – लॉर्ड एल्गिन
◾️” टिळकांना कारावासाची शिक्षा दिल्याबद्दल संपूर्ण राष्ट्र रडत आहे “- सुरेंद्रनाथ बनर्जी
◾️” बंगालच्या विभाजनाची घोषणा आमच्यावर बॉम्ब गोळ्याप्रमाणे कोसळली. बंगालची फाळणी म्हणजे आमच्या अस्मितेला हेतुपुरस्पर सरकारने दिलेला धका आहे.” – सुरेंद्रनाथ बनर्जी
◾️” कोणतेही हक्क आपणास भिक मागून मिळत नसतात ते तीव्र आंदोलन करून राज्यकर्त्यांकडून हिसकून घेतले पाहिजेत.” – लाला लजपतराय
◾️‘कर्झनची तुलना औरंगजेबशी’ – गोखले
◾️‘रॅडची(Rand) तुलना अफजलखानाशी ‘ – लोकमान्य टिळक
◾️” आम्हाला न्याय हवा आहे भिक नको” – दादाभाई नौरोजी
◾️“बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष हे बंगालचे नेते कॉंग्रेसला पुढे खेचण्याचा प्रयत्न करीत होते तर फिरोजशाह मेहता व दिनशा वाच्छा कॉंग्रसला मागे खेचत होते.”- आचार्य जावडेकर
◾️“लखनौच्या करारातूनच पाकिस्तानच्या मागणीची पायाभरणी झाली” – डॉ. मुजुमदार
◾️” कोणत्याही परिणामांचा थोडाही विचार न केलेला करार म्हणजे लखनौ करार.”
 – गारेट ब्रिटीश इतिहासकार.
◾️” अनी बेझंट यांना स्थानबद्ध करून सरकारने अनेक बेझंट निर्माण केले आहेत.” – लॉर्ड मॉनटेग्यु
◾️करांतीकारकांना ‘वाट चुकलेले तरुण’ असे अनी बेझंट यांनी संबोधले.
◾️“गांधीजी राष्ट्रीय आंदोलन मोठ्या जोमाने सुरु करतात, काही काळ या आंदोलनाचे नेतृत्व कुशल रीतीने सांभाळतात; परंतु शेवटी आंदोलन यशस्वी होत असतानाच आपल्या ध्येयाचा विचार न करता ते मधूनच पळ काढतात.” – चित्तरंजन दास.
◾️” एका वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची घोषणा करणे म्हणजे एखाद्या लहान मुलाने बोलण्यासारखे आहे.” – सुभाषचंद्र बोस यांची गांधीजींवर टीका.
◾️“देवाने माझे उर्वरित आयुष्य वि. दा. सावरकरांना द्यावे” – वि. रा. शिंदे
◾️“हे स्वराज्यही नव्हे आणि त्याचा पायही नव्हे” टिळकांची मॉटेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावरील टीका.
◾️“भारतीय विणकरांना मरणाची अवकळा प्राप्त झाली आहे. व्यापार उद्योगाच्या संपूर्ण इतिहासात असे उदाहरण सापडणार नाही. 
भारतीय विणकरांची अस्थींमुळे जणू भारतीय मैदानी प्रदेशाला एकप्रकारची स्मशानकळा आली आहे.” विल्यम बेंटिक
◾️इग्लंडकडे जाणाऱ्या भारतीय संपत्तीचे वर्णन ” लक्ष्मी विलायतेला चालली.” लोकहितवादी
◾️असहकार चळवळ तहकूब केल्याच्या घटनेचे ‘नॅशनल कॅलॅमिटी’ वर्णन सुभाषचंद्र बोस यांनी केले.
◾️सभाषचंद्र बोस यांनी दांडी यात्रेची तुलना नेपोलियनने एल्बाहून परतल्यावर पॅरिसकडे केलेल्या संचालनाशी केली.
◾️“जर ब्रिटीशांनी स्वराज्याचा हक्क फक्त मुस्लिमांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही, फक्त राजपुतांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही किंवा हिंदुमधील कनिष्ठ वर्गालाच फक्त स्वराज्य बहाल केले तरी त्यासाही माझा प्रत्यवाह नाही” – लोकमान्य टिळक
◾️खान अब्दुल गफार खान यांचे वर्णन “हिंदूंच्या प्रभावाखाली असणारे आणि लढाऊ पाठांनांच्या खच्चीकरणाचे प्रमुख” असे वर्णन – महम्मद आली जिना
◾️1857 चा उठाव हा कामगार सैनिकांचा भांडवलशाही विरुद्ध व जमिंदरांविरूद्धचा उठाव होता – कार्ल मार्क्स
सामान्य ज्ञान जनरल नॉलेज (General Knowledge in Marathi) आणि चालू घडामोडी (Current Affairs in Marathi) हा घटक स्पर्धा परीक्षा (Competitive Exam in Marathi) दृष्टीने  अतिशय महत्वाचा घटक आहे, दिवसेंदिवस विविध माध्यमांच्या माध्यमातून यावर खूप भर दिला जात आहे व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवला जात आहे. त्यामुळे आम्ही आमच्या https://sakshidar.co.in या वेब साईट च्या  माध्यमातून आमच्या https://sakshidar.co.in ह्या वेब साईट वर जनरल नॉलेज आणि चालू घडामोडी वर आधारित सर्व प्रश्नसंच  दैनिक स्वरूपात  उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत.
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *