0 0
Read Time:3 Minute, 27 Second

श्रीरामपुरात पुन्हा आज १५ करोनाबाधित रुग्ण, कोरोना बाधितांची  संख्या १०१ वर

श्रीरामपूर (Shrirampur) शहरातील आज १५ रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून कोरोना बाधितांची एकूण संख्या १०१ वर गेली आहे. आतापर्यंत ३५८ जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत तर ६११ जणांचे स्त्राव घेण्यात आले. ६११ पैकी १३० व्यक्तीचे अहवाल येणे बाकी आहे. आतापर्यंत कोरोना मुळे श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यात ३ जणांच मृत्यू झाला आहे अशी माहिती श्रीरामपुर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ मोहन शिंदे यांनी दिली आहे.

भागाप्रमाणे रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे 

आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये श्रीरामपूर (Shrirampur) शहरातील वार्ड नं २ भागातील एकूण ५ रुग्ण, रेव्हेन्यू कॉलनी भागातील एकूण ४ रुग्ण, फातेमा हौसिंग सोसायटी भागातील ५ रुग्ण तसेच मोरगे वस्ती भागातील एकूण १ रुग्ण यांचा समावेश आहे.. 
  • वार्ड नं २ भाग चे एकूण ५ रुग्ण :- ६५ वर्षीय पुरुष, ३१ वर्षीय महिला, ३६ वर्षीय महिला, ६७ वर्षीय महिला, व एक लहान ४ वर्षीय मुलगी यांचा समावेश आहे
  • रेव्हेन्यू कॉलनी भाग येथील एकूण ४ रुग्ण :- २३ वर्षीय पुरुष, २७ वर्षीय पुरुष, २७ वर्षीय पुरुष व एक लहान २ वर्षीय मुलगी यांचा समावेश आहे
  • फातेमा हौसिंग सोसायटी भाग एकूण ५ रुग्ण :- ३५ वर्षीय पुरुष २४ वर्षीय पुरुष २४ वर्षीय महिला २० वर्षीय महिला ५६ वर्षीय महिला यांचा समावेश आहे
  • मोरगे वस्ती भाग एकूण १ रुग्ण :- ४९ वर्षीय महिला 

श्रीरामपूरकर, खालील काही उपाय आपणास कोरोना पासून वाचण्यापासून मदत करू शकतात.

काय काळजी घ्याल ?
शक्यतो चेहऱ्याला हात लावणं टाळा, हात धुवून मगच चेहऱ्याला स्पर्श करा, गर्दीत जाणं टाळा, बाहेर पडताना मास्क किंवा हातरुमाल लावा, सर्व सरकारी कोरोना विषयी सूचनांचे पालन करा.
गरोदर स्त्रियांनी काय काळजी घ्यावी ?
गर्दीत जाणं टाळा, बाहेर पडताना मास्क किंवा हातरुमाल लावा, थोडी जरी सर्दी झाली असेल तरी डॉक्टरांचा सल्ला घ्या
लहान मुलांबाबत काय काळजी घ्यायची ?
आजारी मुलांना कुठेही पाठवू नका. मुलांना स्वच्छतेचं योग्य असे प्रशिक्षण द्या. लहान मुलांमध्ये कोरोना विषयी जनजागृती करा.
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *