अकोले तालुक्याच्या भूषण बीजमाता राहीबाई पोपरे यांना ‘पद्मश्री’ तर अन्नमाता ममताबाई भांगरे यांना केंद्रीय कृषी मंत्रालयाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल आज त्यांचा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पक्ष कार्यालयात आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सिताराम पाटील गायकर साहेब, तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.