जिल्हा माहिती कार्यालयातील सिनेयंत्रचालक दिलीप खैरनार सेवानिवृत्त…
जळगाव – जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव येथील सिनेयंत्रचालक दिलीप शिवराम खैरनार हे आज 35 वर्षाच्या प्रदिर्घ शासकीय सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.
सेवानिवृत्ती निमित्ताने श्री. खैरनार यांना जिल्हा माहिती कार्यालयातर्फे स्नेहपुर्ण निरोप देण्यात आला. त्यांना जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आणि माजी जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनीही त्यांच्या भावी आयुष्यासाठी सदिच्छा दिल्यात.
याप्रसंगी जिल्हा माहिती कार्यालयातील श्री. विनोद पाटील यांनी श्री. खैरनार यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या भावी आयुष्यासाठी सदिच्छा दिल्यात. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी श्रीमती उषा लोखंडे, श्री. पंकज ठाकूर यांच्यासह कार्यालयाचे सेवानिवृत्त कर्मचारी रामकृष्ण कोळी उपस्थित होते.
श्री. खैरनार यांनी डिसेंबर 1985 मध्ये प्रकर्षित प्रसिद्धी पथक, नंदुरबार येथे आपल्या शासकीय सेवेस प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव, नाशिक येथे काम केले.