सोन्याच्या दागिन्यांसाठी उद्यापासून नवा नियम..! पालन न झाल्यास जेलवारी..
सोन्याचे दागिने खरेदी करताना ग्राहकांची फसवणूक होऊ नये, यासाठी मोदी सरकारने सराफ व्यावसायिकांसाठी नवा नियम केला आहे. त्याची अंमलबजावणी उद्यापासूनच (ता. 1 डिसेंबर) केली जाणार आहे. या नियमाचे पालन न केल्यास, थेट जेलची हवा खाण्याची वेळ येऊ शकते..
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या शुद्धतेबाबत एक शब्द मोठ्या प्रमाणात वापरला जातो.. तो म्हणजे, ‘हॉलमार्क’..! ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी सरकारने सराफ व्यावसायिकांसाठी दागिन्यांवर हॉलमार्किंग करणे बंधनकारक केले होते.. मात्र, त्यासाठी सराफांना 30 नोव्हेंबरपर्यंत सवलत दिली होती..
आता 1 डिसेंबरपासून या नियमाची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.. दागिन्यांवर हॉलमार्किंग नसल्यास ज्वेलर्सवर कडक कारवाई केली जाणार आहे..देशातील 256 जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आलेय.
सराफांसाठी नियमावली..
▪️ सराफ दुकानाबाहेर बोर्ड लावावा.. त्यावर दुकानात हॉलमार्क केलेले दागिने उपलब्ध आहेत, असे लिहावे.
▪️ ग्राहकांना हॉलमार्क दाखवण्यासाठी दुकानातच 10x चा ग्लास आणि हॉलमार्किंग शुल्कचा चार्ट असावा.
▪️ प्रत्येक दुकानात बीआयएस क्रमांक आणि पत्ता देणे आवश्यक आहे.
नव्या नियमानुसार, ज्या सराफांची उलाढाल 40 लाखांपेक्षा जास्त असेल किंवा त्यांनी नोंदणी केलीय, अशा दुकानातील प्रत्येक दागिन्यावर हॉलमार्क असणे बंधनकारक आहे. शिवाय विकल्या जाणाऱ्या सर्व दागिन्यांवर हॉलमार्किंग असणे आवश्यक आहे.