0 0
Read Time:4 Minute, 12 Second

पोटासाठी रस्त्यावर आजीच्या ‘करामती’; मदतीसाठी धावला रितेश देशमुख

करोना व्हायरसचा विळखा काही केल्या कमी होत नाहीये. अनेक ठिकाणी असलेल्या लॉकडाउनच्या परिस्थितीमुळे अवस्था अजून बिकट झाली आहे. अनेक लोक बेरोजगार झाले आहेत. तर अनेकजण छोटं- मोठं काम करून कुटुंबाचं पोषण करत आहेत. सध्या सोशल मीडियावर अशाच एका आजीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आयुष्य जगताना कोणावर कसे प्रसंग येतील हे काही सांगता येत नाही. लॉकडाउनमध्ये अनेक दिवस उपासमारीची वेळ आलेल्या ७०-७५ वर्षांच्या आजींनी नातवंडांना सांभाळण्यासाठी हातात काठी उचलली आणि रस्त्यावर आपली कला सादर केली.
झाली असेन म्हातारी परि भीक मी मागणार नाही!
काळाने केले उध्वस्त तरी माय ही झुकणार नाही!

सदरील व्हिडीवो हा ऐश्वर्या काळे यांचा असून मराठा ह्या फेसबुक पेज वरून घेतलेला आहे.

पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्यावर करामती करतेय आजी

सात अनाथ नातींना सांभाळण्यासाठी वयाच्या चक्क ७०-७५ वर्षाच्या एका वृद्ध महिलेला लाठी काठीचा खेळ दाखवून पोट भरायची वेळ आलेली आहे. तरुण पणी अनेक चित्रपटांमध्ये धडकलेल्या शांता बाईंनी सीता और गीता, त्रिशूल व शेरणी या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र वेळ कोणावरही येऊ शकते हे न विसरता जिद्दीने आपल्यामधील लाठी काठी फिरवण्याची कला, रस्त्यावर चौका चौकात सादर करून नागरीकांचे मनोरंजन करून हक्काने दोन पैसे मिळवण्याचा शांता बाईं प्रयत्न करत आहेत.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये नऊवारी साडी नेसलेल्या शांता बाई करामती करत आहेत. पैशांसाठी आणि पोटाच्या खळगी साठी त्यांना या वयातही करामती दाखवण्याची कामं करावी लागत आहेत. पण आजी ची जिद्द आणि मेहनत पाहून अनेकांना तिचा अभिमानच वाटला. प्रत्येकजण सोशल मीडियावर शांता बाईं ना “वॉरिअर आजी मां'” या नावानेच संबोधत आहे.
अशा लोकांकडून प्रामाणिकपणा घ्यायचा असतो. जो आपल्याला आयुष्यात खूप काही देऊन जातो  वय वर्षे साधारण ७०-७५ असना-या या रनरागिनी आजीबाई स्वताचा ऊदरर्निवाह करण्यासाठी असे लाठी – काठी चे प्रात्यक्षिक दाखवत आहेत.

या आजीला मदत करणार अभिनेता रितेश देशमुख…

आता या आजीच्या मदतीसाठी अभिनेता रितेश देशमुख सरसावला आहे. त्याने ट्विटरवरून आपल्या चाहत्यांना आजीचा संपर्क कोणाला कुठे होतो का विचारले. आणि अवघ्या थोड्या वेळातच रितेशला आजींचा संपर्क मिळाला. आता रितेश देशमुख आजीला कोणत्या पद्धतीने मदत करतो हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.
#पोटाची खळगी भरण्यासाठी नेहमी संघर्ष हा करावाच लागतो त्यामुळे …!
“माणसाच्या अंगात कला असेल तर तो कधीच उपाशी रहात नाही” हे विधान खरे ठरले आहे.
आज्जीची हि झुझांर कला जास्तीत जास्त लोकानपर्यत पोहचवा हीच आपण सर्वाना विनंती.
जय शिवराय..!
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *