वाशिम उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा मासिक शिबीर दौरा कार्यक्रम आयोजित
वाशिम, दि. 1 जानेवारी 2023 : जिल्हयातील मोटार वाहन चालक/मालक यांच्या सोयीसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक यांचा सन 2023 या वर्षातील माहे जानेवारी 2023 ते जून 2023 या कालवधीत मासिक शिबीर दौरा आयोजित केला आहे.
मासिक शिबीर दौऱ्यात वाहन कर वसुली, मोटार वाहन नोंदणी, तपासणी,वाहन चालक अनुज्ञप्ती तयार करण्यात येणार आहे. माहे जानेवारी 2023 मध्ये कारंजा येथे 5 जानेवारी, रिसोड – 10 जानेवारी, मानोरा – 13 जानेवारी, मंगरुळपीर – 17 जानेवारी आणि कारंजा – 20 जानेवारी. माहे फेब्रुवारी महिन्यात कारंजा – 3 फेब्रुवारी, रिसोड – 7 फेब्रुवारी, मानोरा – 13 फेब्रुवारी, मंगरुळपीर – 16 फेब्रुवारी आणि कारंजा 21 फेब्रुवारी. माहे मार्च महिन्यात कारंजा येथे 3 मार्च, रिसोड – 8 मार्च, मानोरा – 14 मार्च, मंगरुळपीर – 17 मार्च आणि कारंजा 21 मार्च. एप्रिल महिन्यात कारंजा येथे 5 एप्रिल, रिसोड – 10 एप्रिल, मानोरा – 13 एप्रिल, मंगरुळपीर – 18 एप्रिल व कारंजा – 21 एप्रिल. मे महिन्यात कारंजा येथे 4 मे, रिसोड – 9 मे,मानोरा – 12 मे, मंगरुळपीर – 17 मे आणि कारंजा 23 मे जून महिन्यात कारंजा येथे 5 जून रोजी, रिसोड – 9 जून, मानोरा – 13 जून, मंगरुळपीर – 16 जून आणि कारंजा येथे 20 जून रोजी हे शिबीर आयोजित केले आहे. RTO Camp in Washim District
जिल्हाधिकारी वाशिम यांच्या आदेशानुसार मास्क लावणे, सामाजिक सुरक्षित अंतर राखणे आणि वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील. जर मासिक शिबीर दौऱ्याच्या दिवशी सुट्टी जाहिर झाल्यास शिबीर दौरा दुसऱ्या दिवशी कार्यालयीन दिवशी घेण्यात येईल. अर्ज स्विकारण्याची वेळ सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत राहील असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम यांनी कळविले आहे. RTO Camp in Washim District