पुणे : पुण्यात दिवाळी पाडव्याला काल (शनिवारी) रात्री दोन ठिकाणी घरगुती सिलिंडरचा स्फोट झाला. पुण्यातील वारजे माळवाडी आणि अप्पर इंदिरानगर परिसरात घरगुती सिलिंडरचा स्फोट झाल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. सिलिंडरच्या स्फोटात दोन जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. सिलिंडरचा स्फोट झाल्याने दोन्ही घरांना भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच दोन्ही ठिकाणी आग आटोक्यात आणल्याने मोठी हानी टळली. जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या दोन्ही घटना काल (दि. 2) रात्रीच्या सुमारास वारजे माळवाडी व अप्पर इंदिरानगर परिसरात घडल्या. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील वारजे माळवाडी आणि अप्पर इंदिरा नगर परिसरात घरगुती सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही ठिकाणची आग तातडीने आटोक्यात आणण्यात आली.

आणखी पहा..

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *