महास्वयंम वेब साईट वर नावनोंदणीचा डाटा दिनांक ३१ऑगस्ट २०२० पर्यंत अपडेट करावा || Mahaswayam Website Data need to be Update urgently
नगर जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना कळविण्यात येते की, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडे नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या नावनोंदणीचा डाटा दिनांक ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत www.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर अपडेट करण्यात यावा. या नोंदणीचा डाटामध्ये आपला मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, आधार नंबर व त्यांच्या नोंदणी अभिलेख्यामध्ये उदा. स्पेशल विषय, अनुभवाची नोंद इ. माहिती अद्यावत करण्यात यावी. अन्यथा सदर उमेदवारांची नोंदणी ३१ ऑगस्ट २०२० नंतर रद्द झाल्यास त्याची जबाबदारी संबंधितांची राहील याची नोंद घ्यावी, असे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, अहमदनगर कार्यालयाचे सहायक आयुक्त वि. जा. मुकणे यांनी सांगितले आहे.