आरोग्य विभागाची परीक्षा लांबणीवर, विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप…
आरोग्य विभागाकडून 6205 पदांची भरती होणार आहे. त्यासाठी गट ‘क’ करिता आज (ता. 25) व व गट ‘ड’ करिता उद्या (ता. 26) लेखी परीक्षा होणार होती. मात्र, आता अचानक ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे.
आरोग्य विभागाची ही परीक्षा प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी ज्या कंपनीवर दिली होती, ती कंपनी ही प्रक्रिया राबविण्यात अपयशी ठरल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की राज्य सरकारवर आली आहे. परीक्षेची पुढील तारीख सर्व उमेदवारांना मोबाईलवर मेसेजद्वारे कळविण्यात येणार आहे.
परीक्षा घेण्याची जबाबदारी सोपविलेल्या मे. न्यासा कम्युनिकेशन कंपनीकडून ही परीक्षा नियोजित वेळेत पार पाडू शकत नसल्याचे राज्य सरकारला कळविले. त्यानुसार परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल मनापासून माफी मागतो, अशी शब्दांत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खेद व्यक्त केला.