वीरजवान मंगलसिंग परदेशी यांच्या कुटुंबीयांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले सांत्वन…

सावखेडा बुद्रूक, ता. पाचोरा येथील वीरजवान मंगलसिंह जयसिंह परदेशी यांच्या कुटुंबीयांची जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट घेवून सांत्वन केले.

जवान मंगलसिंह परदेशी यांना 14 नोव्हेंबर, 2021 रोजी पठाणकोट येथे कर्तव्यावर असताना छातीत गोळी लागल्याने वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर 16 नोव्हेंबर, 2021 रोजी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर आज पालकमंत्री श्री. पाटील यांनी सावखेडा येथे जावून परदेशी कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी परदेशी कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस केली. तसेच नियमाप्रमाणे मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे सांगितले.

वीरजवान मंगलसिंग परदेशी यांच्या कुटुंबीयांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले सांत्वन…

यावेळी ना. गुलाबराव पाटील यांनी वीरजवान मंगलसिंग परदेशी यांचे आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा-मुलगी यांचे सांत्वन केले. परदेशी कुटुंबाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी आमदार किशोर पाटील, जिल्हा परिषद सदस्य दीपकसिंह राजपूत, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *