विश्वकल्याण ऊपक्रमाचे कार्यकारी संचालक गणेशदादा तनपुरे यांचा वाढदिवस दिपालीताई ससाणे यांच्या उपस्थितीत ऊत्साहात साजरा
श्रीरामपूर: २८नोव्हेंबर २०२१.: विश्वकल्याण ऊपक्रमाच्या माध्यमातून पुणे, मुंबई व महाराष्ट्रात शांतता व आरोग्य यासाठी सामाजिक सेवेचे कार्य करणारे विश्वकल्याण ऊपक्रमाचे कार्यकारी संचालक गणेश दादा तनपुरे यांच्या मुळगावातील विविध स्तरातील मित्रमंडळी यांनी समाजासाठी गणेश तनपुरे यांचे मुंबई पुणे व महाराष्ट्र विविध भागात सामाजिक शांतता, आध्यात्म व आरोग्य , शिक्षण या क्षेत्रातील कार्य जवळून पाहिले व त्यांना या मित्रमंडळींनी अशाच प्रकारचे कार्य आपल्या मुळ गावात करण्यासाठी सुचविले होते. या कार्याची सुरवात म्हणून गणेश दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्रीरामपूर येथील पठाणवस्ती, बोरावके महाविद्यालय परिसरात सामाजिक आरोग्य प्रबोधन, शांततेसाठी शास्रीय ध्यान या सारखे कार्यक्रम राबवत समाजसेवा कार्य श्रीरामपूर येथे करण्यासाठी सुरवात करण्यात आली.
गणेशदादा यांचा वाढदिवस व श्रीरामपूर येथील समाजकार्य सुरवात शुभारंभ कार्यक्रम साजरा करण्यासाठी तनवीर भैया पठाण आणि RB GRUOP मित्रपरिवाराने वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमासाठी स्रीशक्ती ग्रुपच्या संस्थापिका सौ दिपालीताई ससाणे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ऊपस्थित होत्या.
गणेश तनपुरे मित्र मंडळ, RB GROUP मित्र परिवार तसेच तनवीर भैया पठाण, रितेश एडके यांनी गणेश दादांच्या सामाजिक व राजकीय वाटचाली साठी मार्गदर्शन व सहकार्य देण्याचे सांगितले. त्याचप्रमाणे गणेशदादांसारख्या ऊच्चशिक्षित तरुणांनी समाजकारणात व राजकारणात येण्याची गरज असल्याचे सांगितले.
विभागातील विविध अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी सौ दिपालीताई यांनी गणेशदादा व मित्रमंडळीस सहकार्य करण्याचे अश्वासन दिले.
कार्यक्रमासाठी तनपुरे परिवार, घनवट परिवार, पुणे येथील ऊद्योजक , विभागातील वार्ड नं 1 मधील बोरावके नगर,अतिथी कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, यादव नगर आशीर्वाद नगर,शिरसगाव येथील मित्र परिवार आणि नागरिक तसेच नातेवाईक, व वस्तीवरील सदस्य सोमनाथ पटाईत, आदिल पठाण, मुराद पठाण, अमोल सुपेकर, दीपक भाऊ आडांगळे महेश अवचिते,मनीष गांगुर्डे, सरफराज पठाण,चंदू गांगुर्डे, आजम शेख, अनिल वायकर, प्रतीक नरवडे, रोहन आंग्रे, विलास फुलारे, पप्पू शेगर, संतोष वायकर, आकाश वायकर, चंद्रकांत वायकर वानखेडे वकील, सागर वायकर कैलास राऊत महेश तनपुरे, रवी तनपुरे, बबन जाधव, शिरसगाव मधील यादव, ताके, बहिरे, सुल्ताने, इतर अनेक मित्रमंडळी ऊपस्थित होते.