0 0
Read Time:1 Minute, 51 Second

Sakshidar | ‘पहले मंदिर फिर सरकार’ म्हणणारे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री झाल्यावर लोकांना मंदिरात जाऊ देत नाहीत, अशा शब्दात मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे. भाजप आणि वंचित बहुजन आघाडी नंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मंदिर प्रवेशासाठी आक्रमक झालेले दिसत आहेत.

“पहले मंदिर फिर सरकार, ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव दैनिक म्हणणारे लोकांना मुख्यमंत्री झाल्यावर मंदिरात जाऊ देत नाहीत, याला निर्णय शैथिल्य म्हणायचे की तथागतीत पुरोगामित्व सिद्ध करण्याची चढाओढ?” असा खडा प्रश्न मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर विचारला आहे.

सदरील ट्विटर वरील ट्विट आपणास खाली पाहावयास मिळेल —

“सगळीकडे मॉल्स उघडले जात आहेत, सार्वजनिक कार्यक्रमातील लोकांची उपस्थिती 100 करण्याची परवानगी दिली जात आहे, मग सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे?” असा सवालहि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कालच विचारला होता.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed