0 0
Read Time:3 Minute, 43 Second

करोना विषाणू तपासणी करण्याचे नवे कोरोशुअर किट  (Corosure) फक्त ३९९ रुपयांत उपलब्ध 

आयआयटी दिल्लीच्या कुसुमा स्कूल ऑफ बायोलॉजिकल सायन्सेसच्या १० जणांच्या चमूने हे कोरोशुअर (Corosure) किट तयार केले आहे. या किटचे वैशिष्ट्य म्हणजे ही प्रोबलेस किट आहे. या तपासणीच्या पद्धतीत प्रोबची आवश्यकता नाही, म्हणून किटमध्ये प्रोब ठेवण्यात आलेले नाही. म्हणून हे किट स्वस्त आहे. आयआयटी दिल्लीने (IIT Delhi) बनविलेल्या आरटी पीसीआर तंत्रज्ञानयुक्त एका किटद्वारे (कोरोशुअर (Corosure) ) कोरोना विषाणूची तपासणी केवळ ३९९ रुपयांमध्ये होऊ शकणार आहे. इतकेच नाही, तर हे कोरोशुअर (Corosure) किट अवघ्या दीड तासात चाचणीचा रिपोर्ट देखील देणार आहे. या उपयुक्त आणि सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशा किंमत असणाऱ्या या कोरोशुअर (Corosure) किटची निर्मिती करण्यासाठी सहा कंपन्यांना परवाने देण्यात आले आहेत. यापैकी एका कंपनीने हे उत्पादन तयार देखील केले आहे. हे नवे उत्पादन बुधवारी लाँच करण्यात आले.

किटचे तंत्रज्ञान व उत्पादन संख्या 

कोरोना विषाणूची (Corona Virus) तपासणी करणार्‍या या किटचे नाव कोरोशुअर (Corosure) असे आहे. लवकरच या किटद्वारे तपासणी सुरू करण्यात येणार आहे. हे आरटी पीसीआर तंत्रज्ञानचा वापर करण्यात आलेले एक असे किट आहे जे अतिशय कमी वेळेत आपला रिपोर्ट देणार आहे. रुग्णावर वेळेत उपचार सुरू करण्याच्या दृष्टीने हे फारच महत्वाचे मानले जात आहे. बुधवारी मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या हस्ते या कोरोशुअर (Corosure) किटचे अनावरण करण्यात आले. या किटची किंमत ३९९ रुपये इतकी असून सहा कंपन्यांना ते तयार करण्याचा परवाना देण्यात आला आहे, अशी माहिती पोखरियाल यांनी दिली. एका महिन्याच्या कालावधीत तब्बल २० लाख कोरोशुअर (Corosure) किट तयार करता येतात.

किटच्या रुपात हे नवे उत्पादन बाजारात येण्यासाठीचा कालावधी  

किटच्या रुपात हे नवे उत्पादन बाजारात येण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.  देशभरात करोनाचा कहर झाल्यानंतर करोनाच्या महागड्या चाचण्या सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेल्या होत्या. हा मुद्दा लक्षात घेत केंद्र सरकारने चाचण्याचे मूल्य कमी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. मात्र असे असले तरी समाजातील सर्वच स्तरातील लोकांना परवडेल असे नव्हते. मात्र, कोरोशुअर सारखे किट स्वस्त किमतीत होत असून ते समाजातील अधिकाधिक लोकांना परवडू शकणार आहे, हे महत्त्वाचे.
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *