0 0
Read Time:3 Minute, 15 Second

नगर जिल्ह्यात १ हजार अँटीजेन चाचण्या; १५८ जणांना कोरोना

नगर जिल्ह्यात आज कोरोना टेस्ट लॅबमध्ये १० रुग्ण बाधित आढळून आले तर खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या आणि पोर्टलवर नोंद झालेल्या १७३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली.  त्याच बरोबर बाधित रुग्णांच्या संपर्कातील निकट सहवासितांची जलद गतीने तपासणी करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने  जिल्ह्यात अँटीजेन चाचण्यांना  गेल्या ३-४ दिवसापासून सुरुवात केली आहे. 
आतापर्यंत नगर जिल्यामध्ये १०९५ चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात १५८ जण बाधित आढळले आहेत. त्याचीही नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता ८५४ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या २०२७ इतकी झाली आहे. 

अँटीजेन कीटचे वितरण :

नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, नेवासा, पाथर्डी, कोपरगाव, संगमनेर या तालुक्यांना व अहमदनगर कॅन्टोन्मेंट  आणि महानगरपालिका आरोग्य यंत्रणेला या अँटीजेन कीटचे वितरण करण्यात आले आहे. मागील  तीन-चार दिवसात केलेल्या चाच्ण्याचा एकत्रित अहवाल आज जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे येऊन त्यात बाधित आढळलेल्या रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. 
बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांची चाचणी करण्यात येत आहे. या प्रक्रियेचा वेग वाढावा यासाठी जिल्ह्यातील तालुकास्तरीय आरोग्य यंत्रणेला अँटीजेन किटचे वितरण करण्यात आले आहे.  त्या माध्यमातून बाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. नगर जिल्ह्यात अशा कोरोना चाचण्यांच्या माध्यमातून बाधित आढळलेल्या १५८ रुग्णांची आज भर पडली. 
याशिवाय, खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या आणि आयसीएमआर पोर्टलवर नोंद झालेल्या १७३ रुग्णांची नोंद ही एकूण रुग्ण संख्येत करण्यात आली आहे.याच दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना टेस्ट लॅबमध्ये १० रुग्ण बाधित आढळून आले होते.
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *