भंडारदरा पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्य वृष्टी मुळे भंडारदरा धरण भरले.. || Bhandardara Dam overflow due to Heavy Rain 

Shrirampur 24Tass : (Bhandardara Dam Overflow) भंडारदरा पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्य वृष्टी सुरु असून आज सकाळी सहा वाजता भंडारदरा धारण  भरले आहे. तसेच वाकी जलाशयातून  २५४५ क्यूसेक ने पाणी वहात असल्याने प्रवरा नदीतून सुमारे ६५०० क्युसेस वेगाने पाणी सुरू झाले आहे. विसर्ग आज दुपारी वाढविण्यात येईल असे जलसंपदा विभागाने सांगितले असून जलशात खालील व नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Bhandardara Dam Overflow)

55

(Bhandardara Dam Overflow) भंडारदरा पाणलोट क्षेत्रात काल (ता.१५) जलाशयात १०००१ दशलक्ष घनफूट इतका  पाणी साठा होता. मात्र रात्री जोरदार वृष्टी झाल्याने धरणातील आवक ८०१ दशलक्ष घनफूट आल्याने कार्यकारी अभियंत्यांनी सकाळी ६ वाजता जलाशय भरल्याचे जाहीर केले. सांडव्यातून पाण्याने प्रवरा पात्रात झेपावल्या वेळी अधिकाऱ्यांनी जलाशयात नारळ, साडी अर्पण करून पूजा केली.  (Bhandardara Dam Overflow)

55

(Bhandardara Dam Overflow) काल दिनांक १५ ऑगस्ट २०२० रोजी झालेल्या पाऊस घाटघर २४५, रतनवाडी २४०, पांजरे २३०, भंडारदरा १७५ मिलीमीटर नोंद झाली. सर्वाधिक पाऊस घाटघर येथे १०इंच पडला त्यामुळे सर्व पाणलोट क्षेत्र हे जलमय झाले आहे. भंडारदरा जलाशय भरल्याचे लाभक्षेत्रातील आनंद द्विगुणित झाले आहे. परंतु अति पावसामुळे पाणलोट परिसरातील शेतकर्यां तसेच नागरिकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते, अतिपावसामुळे परिसरातील भातशेतीचे मोठे प्रमाणात नुकसान होते तर परिसरातील जनावरे दगावण्याचे प्रमाण हि वाढते.  

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *