0 0
Read Time:4 Minute, 51 Second

श्रीरामपूरात आज ७ जण कोरोना पॉझिटिव…बाधितांचा आकडा ७२ वर

आज श्रीरामपूर तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांनामध्ये ७ रुग्णांची वाढ झाली आहे यामध्ये चार पुरुष व तीन महिला असून बेलापूर खुर्द मधील १ रूग्ण, वार्ड नंबर ७ मधील १ रूग्ण, मोरगे वस्ती मधील १ रूग्ण, अशोकनगर मधील १ रूग्ण, गळनिब मधील १ रूग्ण, रेव्हेन्यू कॉलनी मधील १ रूग्ण, भोकर मधील १ रूग्ण असे ऐकून सात जणांचा अहवाल आज पॉझिटिव आला असून अजून १३५ जणांचा अहवाल येणे बाकी आहे.

आता श्रीरामपूर तालुक्याच्या कोरोना बाधितांचा आकडा ७२ वर केला आहे अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी दिली ज्या ठिकाणी रुग्ण सापडले आहे तो पूर्ण भाग कंटनमेंट झोन म्हणून प्रशासनाच्या वतीने घोषित करण्यात आलेला आहे.

आता तरी श्रीरामपूर शहरातील नागरिकांनी शासनाचे नियम पाळावे विनाकारण घराच्या बाहेर पडू नये स्वतःची काळजी घ्यावी. तोंडाला मास्क वापरा, सोशल डिस्टन्स ठेवा असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ मोहन शिंदे यांनी श्रीरामपुरातील नागरिकांना केले आहे.

✍🏻 कोरोना टाळायला आपणास खालील सूचना चा उपयोग होवू शकतो…

१) आपण कोणत्याही दुकानात, दवाखान्यात गेल्यावर तेथील कोणत्याही वस्तूला विनाकारण स्पर्श करू नका. आपली कोणतीही वस्तू म्हणजे मोबाईल, चावी, चष्मा तेथील टेबल, खुर्ची, फर्निचर वर ठेऊ नका याच्याने कदाचित कोरोना तुमच्या बरोबर घरी येऊ शकतो.
२) विना कारण कोणाच्या गाडीवर बसू नका, किंवा  गाडीला म्हणजे आरसा, हॅन्डलला हात लावू नका. याच्याने सुद्धा कोरोना तुमच्या बरोबर येऊ शकतो, दोन व्यक्तींमध्ये सहा फुटाचे अंतर ठेवा
३) बऱ्याच लोकांना गप्पा मारतांना हाताची टाळी मारणे, खांद्यावर हात ठेवणे अशी सवय असते याच्याने सुद्धा कोरोना तुमच्या बरोबर येऊ शकतो.
४) ऑफिस मध्ये एकाच वेळी जेवायला बसले असाल तर शक्यतो कोणाचाही डब्बा शेअर करू नका. आपला डब्बा आपणच खावा एकाच पाण्याच्या बाटलीने सर्वांनी पाणी पिऊ नका. याच्याने सुद्धा कोरोना तुमच्या बरोबर येऊ शकतो.
५) ऑफिस, बँक मध्ये फॉर्म भरतांना कोणाचाही पेन मागू नका. याच्याने सुद्धा कोरोना तुमच्या बरोबर येऊ शकतो.
६) कोणत्याही परिस्थितीत हात स्वच्छ धुतल्याशिवाय तोंडाला, नाकाला, डोळ्यांना स्पर्श करू नका, तोंड व नाक झाकण्याकरिता मास्क वापरा
७) विना कारण घराबाहेर जाऊ नका. घरात तूम्ही एकटे नाही आहात तुमच संपूर्ण कुटुंब आहे त्यात सर्व वयोगटाच्या व्यक्ती आहेत. प्रत्येकाची रोग प्रतिकार शक्ती वेगवेगळी असते हे पण लक्षात ठेवा.
८) नेहमी आपल्या घरच्या शौचालयाचाच वापर करा.
९) ताजे व पोटभर जेवण , आवळा ज्यूस, लिंबू पाणी , गरम चहा,मसालेयुक्त काढा, ताजी फळे , गरम पाणी इ. घेत रहा
१०) कोरोना आपल्याला होणारच नाही ह्या भ्रमात राहू नका सरकारने सांगितलेल्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करा.
  
११) कोविड-१९ हा एक संसर्गजन्य आजार असून तो कोणालाही होऊ शकतो. म्हणून कोणासोबत भेदभाव करू नका. कोणालाही तिरस्काराची वागणूक देऊ नका. कोरोनावीरांना प्रोत्साहन द्या

मीच आहे माझा व माझ्या परिवाराचा रक्षक 🏠




Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *