आरसेटीव्दारे बकरी पालनाचे (गोट रिअरींग) निशुल्क प्रशिक्षण

भंडारा, दि. 28 : बॅंक ऑफ इंडिया प्रायोजित स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था द्वारे बकरी पालनाचे (गोट रिअरींग) प्रशिक्षण वर्गाचे आयोजन 29 ऑगस्ट 2022 पासून करण्यात येत आहे. 10 दिवसीय प्रशिक्षणात बकऱ्यांच्या जाती, प्रजाती, आहार, औषधोपचार, लसीकरण, पालन पोषण, कर्ज विषयक मार्गदर्शन, उद्योजकीय कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, प्रकल्प अहवाल, व्यवसायातील संधी, बाजार सर्वेक्षण, बॅंकेच्या योजनांची माहिती दिली जाईल.आहे

आरसेटीव्दारे बकरी पालनाचे (गोट रिअरींग) निशुल्क प्रशिक्षण

स्वयंरोजगाराची आवड, व्यवसाय करण्याची तयारी, वय 18 ते 45 वर्षे, शिक्षण 10 वी पास किंवा नापास, भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या बेरोजगार पुरुष, महिलांनी मुलाखतीकरिता 29 ऑगस्ट 2022 ला सकाळी 10 वाजता स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, लाल बहादूर शास्त्री शाळेच्या बाजूला, शास्त्री चौक, भंडारा येथे उपस्थित राहण्याचे आवाहन संस्था संचालक मिलिंद इंगळे यांनी केले आहे.

प्रशिक्षण प्रवेशासाठी आयोजित मुलाखतीकरिता येतांना उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, रेशनकार्ड, आधारकार्ड, मनरेगा कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना जेवण, चहा, नाश्ता, वह्या-पुस्तके, राहणे आदींची सोय मोफत केली जाईल. अधिक माहितीकरीता 8669028433, 9511875908, 9766522984 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment