स्पर्धा परीक्षा सामान्य ज्ञान : काळाराम मंदिर सत्याग्रह एक क्रांतिकारक घटना || Competitive Exam General Knowledge – Kalaram Madir Satyagrah


काळाराम मंदिर सत्याग्रह आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

नाशिक मधील पंचवटीतील काळाराम मंदिर प्रवेशासाठीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला संघर्ष सर्वश्रुत आहे.काळा राम मंदिर मध्ये प्रवेश न मिळाल्याने डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांनी हिंदू धर्मत्यागाची घोषणा केली आणि देशाच्या इतिहासाला एक नवे वळण मिळाले. काळाराम मंदिर सत्याग्रह (Kalaram Madir Satyagrah) ही क्रांतिकारक घटना होती. या सत्याग्रहाच्या माध्यमातून  जातीव्यवस्थेच्या बुरुजाला सुरुंग लावण्याचे काम झाले. काळाराम मंदिर सत्याग्रह करण्याआधी ‘बहिष्कृत भारत’ या दैनीका मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एक झणझणीत अग्रलेख लिहिला. त्यात त्यांनी लिहले होते की, ‘काळाराम मंदिरासाठी सत्याग्रह करणं अपरिहार्य झाले आहे आणि आपण लवकरच मंदिर प्रवेशाची चळवळ हाती घेणार. 
यानंतर काळाराम मंदिर सत्याग्रह (Kalaram Madir Satyagrah) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 2 मार्च 1930 रोजी महाराष्ट्राच्या नाशिक शहरातील अस्पृश्यांचा काळा राम मंदिरामध्ये प्रवेशासाठीचा सत्याग्रह केला होता. काळाराम मंदिर सत्याग्रहात स्त्रीयांचा सहभाग हा खूप मोठ्या प्रमाणात होता आणि इसवी सण 1935 मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार सत्याग्रह मागे घेण्यात आला.

काळाराम मंदिर सत्याग्रह” एक क्रांतिकारक घटना”

◾️केशव नारायण देव यांच्या अध्यक्षतेखाली विहीतगाव-देवलाली येथे प्रथम 29 डिसेंबर 1929 रोजी विहीतगावच्या चावडीत झालेल्या बैठकीमध्ये मंदिर प्रवेशाची घोषणा केली
◾️”आम्ही जर हिंदू असू तर आम्हाला मंदिरात जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही” ही समानतेची वागणूक मिळावी यासाठीचा हा लढा होता
◾️सत्याग्रह समितीचे अध्यक्ष म्हणून केशव नारायण वर्धेकर ऊर्फ बुवा
◾️भाऊराव उर्फ कर्मवीर दादासाहेब गायकवाड सचिव होते. 
◾️तर नाशिकचे शंकरराव गायकवाड हे सभासद 
◾️शकरराव गायकवाड ऊर्फ बेलमास्तर मूळचे निफाड तालुक्यातील
◾️मोठ्या राजवाड्यातील जाहीर सभेत या धाडसाबद्दल त्यांना बेलमास्तर ही पदवी बहाल
◾️2 मार्च 1930 ही सत्याग्रहाची तारीख निश्चित झाली.
◾️नाशिकचे जिल्हाधिकारी “R. G. गॉर्डन” यांनी मध्यविभागाचे आयुक्त “घोषाळ” यांना सत्याग्रहाची माहिती कळविली होती
◾️2 मार्च 1930 रोजी सुरू झालेल्या आंदोलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबत सहस्त्रबुद्धे, देवराव नाईक, डी.व्ही.प्रधान, बाळासाहेब खरे, स्वामी आनंद हे होते.
◾️गोदावरीच्या रामकुंडात उडी घेऊन सत्याग्रह यशस्वी करण्याची जबाबदारी शंकरराव गायकवाड यांच्यावर सोपवण्यात आली. 
◾️ इग्रजांनी शंकरराव गायकवाड यांना रामकुंडात उडी मारली म्हणुन काठीने मारले
◾️सत्याग्रहाबद्दल गुन्हा दाखल झाल्यावर न्यायालयात त्यांना तुमचा जामीनदार कुठे आहे’, अशी विचारणा करताच त्यांनी डॉ. आंबेडकर माझे जामीनदार असून, ते इंग्लंडमध्ये आहेत, असे सांगितल्याने न्यायालयाने त्यांना सात दिवस साध्या कैदेची शिक्षा ठोठावली

“आम्ही पण एक सजिव माणूस आहोत”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आम्हाला काळाराम मंदिराचा प्रवेश करून कोणी रामभक्त बनायचे नाही, तर या भारत देशामध्ये असणा-या दगड जाती व्यवस्थेला सांगायचे आहे की, आम्ही पण एक सजिव माणूस आहोत हे दाखवून द्यायचे आहे. तुमच्या या मंदिरामध्ये कुञी, मांजरे, शेळ्या, मेंढया हे प्रवेश करू शकतात. तर आम्ही का नाही…?
5 वर्ष 11 महिने आणि 7 दिवस पर्यंत काळाराम मंदिर सत्याग्रह (Kalaram Madir Satyagrah) सुरु होता. तरीही मंदिराचे दरवाजे हि दलितांसाठी उघडले गेले नाहीत त्यामुळे हिंदू धर्माची अपरिवर्तनियता पाहून  आंबेडकरांनी हिंदू धर्म त्याग करावयाचा निर्णय घेतला.अशा प्रकारे हा काळाराम मंदिराचा प्रवेश सत्याग्रह १९३५ पर्यंत चालला.

सदरील माहिती हि स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यास साठी प्रकाशित केलेली आहे. सदरील माहितीमध्ये / घटनेमध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कंमेंट मध्ये सांगा किंवा आम्हाला mind4talk@gmail.com वर कळवा.
आपणास आमची हि माहिती कशी वाटली ते आम्हाला कंमेंट्स बॉक्स मध्ये सांगा आवडल्यास इतरांना नक्की शेर करा.
धन्यवाद..!!!
टीम –  Mind4Talk

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment