अकोले नगरपंचायत द्वारे “आजादी का अमृत महोत्सव” उपक्रमाचे आयोजन

अकोले ०८ ऑगस्ट २०२२ : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व स्वातंत्र्य संग्रामातील घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे या उद्देशाने देशात “आजादी का अमृत महोत्सव” उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

अकोले नगरपंचायत द्वारे “आजादी का अमृत महोत्सव” उपक्रमाचे आयोजन

त्या अंतर्गत दिनांक १३ ऑगस्ट २०२२ ते दिनांक १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये केंद्र शासनच्या सूचनेनुसार “हर घर तिरंगा” महोत्सव हा उपक्रम स्थानिक स्वराज्य संस्थांना राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत,या अनुषंगाने अकोले नगरपंचायत द्वारे अकोले शहरात चित्ररथ फिरविण्यात येत असून याद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात येते कि आपण हर घर तिरंगा अंतर्गत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे..

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment