अतिवृष्टी व वीजा चमकत असल्यास काय दक्षता घ्यावी…

आजचा साक्षीदार |Sakshidar: नैसर्गीक वीज पडून, पुरात वाहुन जावून होणारी जिवीत व वित्त हानी टाळणेकरिता पुढिल प्रमाणे दक्षता घेण्यात यावी.

वादळी वारा/वीजा चमकत असल्यास काय करावे…
वादळी वारा/वीजा चमकत असल्यास घरात असल्यास घराच्या खिडक्या व दरवाजा बंद ठेवावे. घराच्या दरवाजे खिडक्या, कुंपणापासून दुर राहावे. मेघगर्जना झाल्यापासून ३० मिनिटे घराच्या आतच रहावे. घराबाहेर असल्यास त्वरित सुरक्षित निवा-याच्या ठिकाणाकडे (मजबूत इमारतीकडे) प्रस्तान करावे, ट्रॅकटर्स, शेतीची अवजारे, मोटरसायकल, सायकल यांचेपासून दूर रहावे, गाडी चालवत असल्यास सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करावा, उघड्यावर असल्यास शेवटचा पर्याय म्हणुन लगेच गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व डोके दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये झाकावे, जमीनीशी कमीत कमी संपर्क असावा, मोकळया तसेच लटकत्या विद्युत तारांपासून दुर रहावे, जंगलामध्ये लहान झाडाखाली, उताराच्या जागेवर निवारा घ्यावा. इतर खुल्या जागेवर असल्यास दरीसारख्या खोल जागेवर जाण्याचा प्रयत्न करावा.

वीज पडल्यास / वज्राघात झाल्यास
त्वरीत रुग्णवाहीका व वैद्यकिय मदत बोलवा, वाज्राघात बाधित व्यक्तिस त्वरित वैद्यकीय मदत मिळवून द्या. त्याला हात लावण्यास धोका नाही. ओल्या व थंड परीस्थितीत, बाधित व्यक्ती व जमिनीच्या मध्ये संरक्षणात्मक थर ठेवावा, जेणेकरून हायपोथेरमीयाचा (Hypothermiya शरीराचे अति कमी तापमान) धोका कमी होईल, इजा झालेल्या इसमाचे श्वसन बंद असल्यास तोंडावाटे पुनरुत्थान प्रक्रिया अवलंबावी. हृदयाचे ठोके बंद असल्यास कुठलीही वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाची हृदय गती CPR करने सुरु ठेवावे.

गडगडाटीचे वादळ आल्यास काय करू नये…
गडगडाटीचे वादळ आल्यास, उंच जागांवर , टेकडीवर, मोकळया जागांवर, समुद्र किनारी, स्वतंत्र झाडे, रेल्वे/बस/सहलीची आश्रय स्थाने, दळणवळणाची टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत/ दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, उघडी वाहने आणि पाणी इत्यादी ठिकाणे टाळावीत.
घरात वायरद्वारे जोडले गेलेले फोन/ मोबाइल व इतर इलेक्ट्रीक/ इलेक्ट्रॉनिक उपकरणे विद्युत जोडणीस लावू नये. गडगडीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करु नये, यादरम्यान आंघोळ करणे, हात धुणे, भांडी धुणे, कपडे धुणे, ही कार्ये करू नयेत. कॉक्रीटच्या (ठोस) जमिनीवर झोपू नये किंवा उभे राहु नये. धातूची दारे, खिडक्यांची तावदाने, वायरींग व इलेक्ट्रीक मिटर इ. प्रवाहकीय पृष्ठभागांशी संपर्क टाळावा.
घराबाहेर असल्यास मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असतांना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहु नये, वाहनांच्या धातू किंवा वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, अधांतरी लटकणा-या/लोंबणा-या वायरींपासून लांब रहावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *