पालघर दि 20 ऑगस्ट 2022 : प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक
जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार या कार्यालयच्या अंतर्गत जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा या चार तालुक्याचा समावेश होतो या तालुक्यातील अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी ICAR Baramati – improving livelihood of tribal farmers through implementation of improved technology interventions in integrated Crops Livestock-Poultry Fisheries या योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन जव्हार प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी आयुषी सिंह यांनी केले.
या योजनेव्दारे अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देणे, त्यांना कृषी या बाबत अद्यायावत तंत्रज्ञान शिकविणे व त्याबाबत त्यांची क्षमता बांधणी करुन त्यांचे उत्पादन वाढविणे इ बाबींचे प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे. उमेदवारांनी खालील कागदपत्रांसह वरील कार्यालयात दि. 22 ऑगस्ट ते दि. 2 सप्टेंबर या कालावधीत विहीत नमुन्यात अर्ज सादर करावे.
अटी व शर्ती तसेच कागदपत्रांबाबत तपशिल पुढीलप्रमाणे…
लाभार्थी हा अनुसुचित जमातीचाच असावा, जातीचा दाखला जोडण्यात यावा, लाभार्थ्याकडे शेतजमीन असल्यास त्यासाठी सातबारा किंवा वनपट्टा धारक असल्याचा दाखला जोडण्यात यावा, लाभार्थ्यांचा रहीवाशी दाखला असावा, ग्रामसभेचा ठराव व नाहरकत दाखला असावा, लाभार्थ्याने आधारकार्ड व रेशनकार्ड च्या छायांकीत प्रती अर्जासोबत सादर कराव्या, अर्जासोबत अलीकडे काढलेले 2 पासपोर्ट आकाराचे फोटो जोडण्यात यावे, विधवा, परितक्त्या, दिव्यांग कातकरी लाभार्थ्यांना योजना मंजुर करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल, लाभार्थी निवडीबाबतचे सर्व अधिकार प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, जव्हार यांनी सर्व अधिकार राखुन ठेवण्यात आले आहेत., विहीत नमुन्याचे लाभार्थी अर्ज कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.