अनुसूचित जमातींसाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण…
पालघर दि. 23 :- अनुसूचित जमातींच्या युवकांसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार, जि. पालघर, यांच्यामार्फत भरती पुर्व पोलीस दल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सदरचे प्रशिक्षण हे पळसुंडे ता. मोखाडा जि. पालघर येथे सन-2021-22 या आर्थिक वर्षात देण्यात येणार आहे.
प्रथम पात्र प्रशिक्षणार्थ्यांची निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. सदरचे प्रशिक्षण हे प्रत्यक्षात भोजनाची व्यवस्था झाल्यानंतर सुरु करण्यात येईल तसे प्रशिक्षणार्थ्यांना कळविण्यात येईल. तरी या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणा-या अनुसूचित जमातीच्या युवकांनी दिनांक 24 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 8.00 वाजता शारिरीक पात्रता चाचणीसाठी सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, पळसुंडे ता.मोखाडा जि.पालघर येथे हजर राहावे. संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 7773925902/ 8698651367/ 9921536367.
सदर निवड प्रक्रिया खालील नमुद कलेल्या वेळापत्रकानुसार होईल.
शारीरीक चाचणी :- दिनांक 24 नोव्हेंबर 2021, सदर चाचणीत पात्र युवकांची लेखी परिक्षा :- दिनांक 25 नोव्हेंबर 2021, अंतिम निवड यादी :- दिनांक 30 नोव्हेंबर 2021
सदर निवड प्रक्रियासाठी खालील प्रमाणे नमुद केलेले सर्व मुळ कागदपत्रे सोबत आणावी. निवड प्रक्रियासाठी येण्या-जाण्याचा किंवा राहण्याचा कोणताही भत्ता या कार्यालयाकडून देण्यात येणार नाही. असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार, जि. पालघर यांनी केले आहे.
पात्रता पुढिलप्रमाणे :
उंची – किमान 165 से.मी., वजन किमान – 50 कि.ग्र., छाती – 79 सेमी ते 84 सेमी (फुगवून), वय – 18 ते 26 वर्ष, शैक्षणिक पात्रता – 12 वी पास, प्रवर्ग – S.T. (अनुसुचित जमाती).
आवश्यक कागदपत्रे पुढिलप्रमाणे :
शाळा सोडल्याचा दाखला, इ.12 वी. पास गुणपत्रक, जातीचा दाखला, डोमीसाईल प्रमाणपत्र, नाव नोंदणी प्रमाणपत्र,