अनुसूचित जमातीच्या कुटुंबांनी शिधापत्रिका व जात प्रमाणपत्र विशेष मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन
हिंगोली दि.१६ जानेवारी २०२३ (आजचा साक्षीदार) – अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत स्थानिक प्रकल्प अधिकारी यांच्या वतीने दि. 01 जानेवारी ते 31 जानेवारी, 2023 या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.
ही मोहिम यशस्वी करण्यासाठी अनुसूचित जमातीच्या कुटुंबांनी शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र काढण्यासाठी विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा. यासाठी प्रकल्प अधिकारी कळमनुरी व संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी, हिंगोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.