पालघर दि 20 ऑगस्ट 2022 : अनुसूचित जमातीच्या दारिद्य रेषेखालील आदिवासी घटकातील युवकांना ऑटोमोबाईल प्रशिक्षण देणे या योजनेसाठी अर्ज सादर करावे असे आवाहन जव्हार प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, आयुषी सिंह यांनी केले
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार या कार्यालया अंतर्गत जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा या चार तालुक्याचा समावेश होतो.
उमेदवारांनी खालील कागदपत्रांसह या कार्यालयात दि.22 ऑगस्ट ते दि. 30 ऑगस्ट या कालावधीत विहीत नमुन्यात अर्ज सादर करावे . यापूर्वी सादर करण्यात आलेले अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. नवीनच अर्ज सादर करावे.
अटी व शर्ती तसेच कागदपत्रांबाबत उपशिल पुढीलप्रमाणे – अर्जदार हा अनुसुचित जमातीचाच असावा,स्वतःचा जातीचा दाखला असावा., दारीद्य रेषेखालचा दाखला असणे आवश्यक आहे.

अपंग अर्जदारांना ३ टक्के आरक्षणानुसार प्राधान्य देण्यात येईल, अर्जदार किमान ८ वी पास असणे आवश्यक आहे. अर्जदाराने सदर योजनेचा लाभ यापुर्वी या कार्यालयाकडुन घेतलेला नसावा, रहीवाशी दाखला असावा.
अर्जदाराच्या नावे ग्रामसभेचा ठराव व नाहरकत दाखला असणे आवश्यक आहे.
अर्जदाराने आधारकार्ड व रेशनकार्डच्या छायांकीत प्रती अर्जासोबत सादर कराव्या.
अर्जासोबत अलीकडे काढलेले २ पासपोर्ट आकाराचे फोटो जोडण्यात यावे.
अंतिम लाभार्थी निवडीबाबतचे व योजनेच्या अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, जव्हार यांनी सर्व अधिकार राखुन ठेवण्यात आले आहेत.
विहित नमुन्या मधील अर्ज कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. अर्जदार शासन नियमानुसार प्रशिक्षण पुर्ण करन्यास इच्छुक असावा. प्रशिक्षण हे निवासी,अनिवासी बाबतचे अधिकार सनियंत्रण व मुल्यमापण समितीने राखुन ठेवलेले आहेत