
..अन् पाकिस्तानी “डॉन न्यूज” चॅनलवर अचानक फडकला भारताचा तिरंगा
Pakistan news channel “Dawn” shows Happy Independence Day : पाकिस्तान मधील प्रसिद्ध ‘डॉन’ (Dawn) या न्यूज चॅनलवर रविवारी दुपारी ३:३० च्या सुमारास अचानक भारता चा तिरंगा फडकला आणि स्वातंत्र्यदिना च्या “Happy Independence Day” अश्या शुभेच्छा देण्यात आल्या. या न्यूज चॅनलवर झेंडा फडकल्यानंतर चॅनलची सिस्टम हॅक झाल्याचं म्हटलं जात आहे.
Pakistan news channel “Dawn” shows Happy Independence Day :पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, डॉन या न्यूज चॅनलची सिस्टम हॅक करण्यात आली असून यामागे काही हॅकर्स असू शकतात. तसेच या तिरंगा फडकण्याच्या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती डॉन या न्युज चॅनेल ने एका निवेदनातून जारी केली आहे.
Pakistan news channel “Dawn” shows Happy Independence Day :तसेच डॉन या चॅनेल यासंबंधी एक ट्विट देखील केले आहे. या ट्विट मध्ये डॉन या चॅनेल म्हटले आहे कि “आम्ही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. हे नेमकं कसं झालं याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. जशी आम्हाला याबाबत काही माहिती मिळेल आम्ही त्याबाबत प्रेक्षकांना कळवू”, असं म्हटलं आहे.