अभिनेत्री प्राजक्ता माळीने सुरु केला “प्राजक्तराज” (PrajaktaRaj Jewellery) ज्वेलरी ब्रँड; उद्घाटनाला मनसे प्रमुख राज ठाकरेंची यांची विशेष उपस्थिती…
आपल्या सोज्वळ अभिनयाने चित्रपट, मालिका, वेबसीरिजच्या माध्यमातून अनेकांच्या मनावर राज्य करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजेच प्राजक्ता माळी. अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं करणारी प्राजक्ता माळी कवियित्री सुद्धा आहे आपणास माहिती आहेच. शिवाय ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमासाठी करत असलेलं सुत्रसंचालनही प्रेक्षकांना खूप आवडतं. अभिनय, नृत्य, कविता यानंतर प्राजक्ताने एक नवा उपक्रम हाती घेतला आहे तो म्हणजे प्राजक्ता माळीने नवीन ज्वेलरी ब्रॅंड सुरु केला आहे. “प्राजक्तराज” (PrajaktaRaj) असं या ब्रॅंडचं नाव असून मनसे अध्यक्ष मा. राज ठाकरे यांच्या हस्ते या ब्रॅंडचं अनावरण करण्यात आलं. यावेळी मा. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या देखील उपस्थित होत्या.

यावेळी मा. राज ठाकरे म्हणाले, दागिने हा माझा विषय नाही, त्यामुळे पत्नीसोबत असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे, मला दागिन्यांची जात कळत नाही पण त्याची वैशिष्ट जपणं देखील महत्त्वाचं आहे असेही ते यावेळी म्हणाले. उद्घाटनाला मनसे प्रमुख मा. राज ठाकरेंची विशेष उपस्थिती होती त्यांनीही प्राजक्ता माळी ला तिच्या पुढील प्रवासासाठी शुभा – आशीर्वाद दिला.
प्राजक्ताने आपल्या या “प्राजक्तराज” (PrajaktaRaj Jewellery) या ज्वेलरी ब्रॅण्डच्या माध्यमातून इतिहासकालीन दागिने पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांसमोर आणले आहेत. या “प्राजक्तराज” (PrajaktaRaj) ब्रॅण्डमध्ये वर्षानुवर्षे चालत आलेले पारंपरिक दागिने म्हणजे सारा, बुगडी, शिंदेशाही तोडे, पैलू पाटली, मासोळ्या, बेलपान, बकुळीहार, पुतळीहार, साज, ठुशी, नथ, मोहनमाळ, चंद्रहार यासारखे अनेक दागिने मिळणार आहेत. या दागिन्यांच्या सोन्या, चांदी आणि तांब्याच्या दागिन्यांच्या शृंखलेची नावं आहेत तुळजा, म्हाळसा आणि सोनसळा. तसेच यासोबतच पुरुषांसाठीही दागिने “प्राजक्तराज” (PrajaktaRaj) ब्रॅंड लवकरच सुरु करणार आहेत. या तर या दागिन्यांच्या शृंखलेची नावं शिवबा, बळीबा आणि रायबा अशी असणार आहेत.

प्राजक्ताने याबाबत तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात तिने याबद्दलची माहिती दिली होती, मात्र अद्याप ब्रँडचे नाव सांगितले नव्हते. आज दिनांक ६ जानेवारी रोजी तिने आपल्या “प्राजक्तराज” (PrajaktaRaj Jewellery) या ज्वेलरी ब्रँडचे उदघाटन केले आणि विशेष म्हणेज मनसेप्रमुख मा. राज ठाकरे या सोहळयाला उपस्थित होते. लग्नसमारंभासाठी किंवा सणावारासाठी परिधान करायचे महाराष्ट्राच्या मातीतले हे दागिने प्राजक्ताने आपल्या “प्राजक्तराज” (PrajaktaRaj Jewellery) ब्रॅण्डच्या रूपाने समोर आणले आहेत.
