आजचा साक्षीदार | दिवसभरातील महत्वाच्या टॉप बातम्या : 22 जानेवारी 2023
विधानसभेचे माजी उपाध्यक्ष, NCP नेते ॲड मोरेश्वर टेमुर्डे यांचे हृद्यविकाराच्या झटक्याने निधन
चीनमध्ये कोरोनाचा कहर; गेल्या सात दिवसांत 13 हजार जणांचा मृत्यू
Somaliaमध्ये अमेरिकेचा एअर स्ट्राईक; Al-Shabab दहशतवादी संघटनेचे 30 जण ठार
भुकंपाच्या झटक्याने उत्तराखंड हादरलं, भूकंपाची तीव्रता ३.८ रिश्टर स्केल
हिवाळ्यात पावसाळा! राज्यात पावसाच्या सरी कोसळणार, हवामान विभागाचा महत्वपूर्ण अंदाज
अभिनेत्री दीपिका कक्कर लवकरच आई होणार आहे. दीपिकाचा पती शोएब इब्राहिमने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली.
भारतीय बनावटीची पहिली नाकावाटे दिली जाणारी लस iNCOVACC 26 जानेवारीला होणार लॉन्च
35 गरजू मुलांची मुंबईत होणार मोफत शस्त्रक्रिया:जळगावात डाॅक्टरांकडून 125 मुलांची तपासणी, रोटरी क्लबचा पुढाकार
गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते
सार्वजनिक आरोग्य विभागाचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर झाला. उस्मानाबाद येथील हॅलो मेडिकल फाउंडेशनला उत्कृष्ट स्वयंसेवी संस्थेसाठीचा पुरस्कार जाहीर झाला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते उद्या दिल्लीतील विज्ञान भवन येथे 11 मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
कुंभ मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये तब्बल 300 कोटी रुपयांचा रिंग रोड तयार होणार, यामुळे नाशिककरांची वाहतूक कोंडी पासून सुटका होणार.
शिवसेनेचा गड असलेल्या परभणी जिल्ह्यातील तब्बल 84 सरपंचांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. यामुळे उद्धव ठाकरे गटाला धक्का बसला.
रिलायन्स जिओ कंपनीने ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 दरम्यान, मागील आर्थिक वर्षाच्या सरासरी 4,638 कोटींचा निव्वळ नफा मिळवला आहे.