आजचा साक्षीदार | दिवसभरातील महत्वाच्या टॉप बातम्या : 23 जानेवारी 2023
👉 INS वगीर पाणबुडी भारतीय नौदलात दाखल, 24 महिन्यांत भारतीय नौदलात सामील होणारी तिसरी पाणबुडी
👉 प्रथमच व्हिसा अर्ज करणाऱ्यांना होणारा विलंब कमी होणार, यूएस मिशन येत्या काही महिन्यांतच निवडक शनिवारी अपॉइंटमेंटसाठी अतिरिक्त स्लॉट उघडणार
👉 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो. बायडेन यांच्या विल्मिंग्टनमधील घरावर एफबीआय चे छापे, 13 तासांच्या झडतीत अंदाजे दीड डझन गोपनीय दस्तऐवज जप्त
👉 शिवशक्ती आणि भीमशक्ती आली एकत्र, ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युतीची घोषणा
👉अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांचा विवाह सोहळा जल्लोषात संपन्न, खंडाळ्यातील फार्महाऊसवर पार पडलं शुभमंगल सावधान!
👉राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. राज्यभरातील 520 पोलीस हवालदारांची पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यासाठी निवड करण्यात आली होती. मात्र, त्यांना संवर्ग न मागितल्यामुळे त्यांची पदोन्नती रखडली होती. परंतु, आता पोलीस महासंचालकांनी सकारात्मक पाऊल उचलले असून निवड झालेल्या हवालदारांची माहिती मागवण्यात आली आहे.
👉कोरोना काळात मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप अनेक वेळा झाला आहे. पण मनसेचे नेते संदीप देशपांडे आज पत्रकार परिषद घेऊन पुराव्यांसहित कथित भ्रष्टाचार बाहेर काढणार आहेत. यावेळी स्क्रीनवर भ्रष्टाचाराचे पुरावे सादर केले जाणार आहेत.
👉अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या संस्थापक अध्यक्षांना धमकी, श्याम मानव यांना त्यांच्या मुलाच्या मोबाईलवर मेसेज पाठवून जीवे मारण्याची धमकी
👉 ओडिशा येथील भुवनेश्वर येथे खेळल्या जात असलेल्या 2023 हॉकी विश्वचषकाच्या क्रॉसओव्हर सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला आहे. या पराभवानंतर भारतीय संघ 2023 च्या विश्वचषकातून बाहेर झाला आहे. शूटआऊटमध्ये न्यूझीलंडने विजय मिळवला आहे.
👉 शेअर मार्केट: आज सेन्सेक्स 319 अंकांच्या वाढीसह 60,941.67 वर तर निफ्टी 90 अंकांच्या वाढीसह 18,118.55 वर झाले बंद
👉 “गायीतून धर्माचा जन्म झाला, गोहत्या थांबली तर पृथ्वीवरील सर्व प्रश्न संपतील”, श्लोकांचा दाखला देत गुजरातमधील न्यायालयाचा निष्कर्ष
👉 अपघातावर बच्चू कडू यांचं स्पष्टीकरण, “माझा अपघातच, पण घातपाताचा संबंध नाही, वाहन चालकाची चुकी नव्हे तर माझ्या गोंधळामुळे अपघात”
👉 अंदमान-निकोबार येथील 21 निनावी बेटांना 21 परमवीर चक्र विजेत्यांची दिली नावं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हजेरी
👉 1 एप्रिलपासून ‘ई- गव्हर्नन्स’ अधिक गतीने सुरू करणार, लोकांना अपेक्षित गतीने शासकीय कामे करता येणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
👉 अनिल देशमुख यांना 100 कोटींच्या कथित वसुलीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; सीबीआयचे जामीनाविरोधातील अपील फेटाळले
👉 अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आईने केली सुनेविरोधात तक्रार, संपत्तीच्या वादाबाबत वर्सोवा पोलीस ठाण्यात चौकशी सुरू
👉 अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल अखेर अडकले लग्नबंधनात! खंडाळ्यातील फार्महाऊसवर 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला विवाह सोहळा
👉 भारतात लाँच होणार 108 मेगापिक्सलचा कॅमेरा असणारा स्मार्टफोन, ओप्पो कंपनी Oppo Reno 8T सिरीज लाँच करण्याच्या तयारीत
👉 मुंबईतील बलात्काराच्या 2 घटनांनी महाराष्ट्र हादरला; 14 वर्षीय मुलीवर शिक्षकाचा आणि 20 महिन्यांच्या मुलीवर 35 वर्षाच्या नराधमाचा बलात्कार
👉 अभिनेत्री राखी सावंतकडून मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन याचिका दाखल, शर्लिन चोप्राचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केल्याचे आरोप
👉 जेईई मेन परीक्षेच्या जानेवारी 2023 सत्रासाठी एकूण 8.6 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, पहिल्यांदाच 30 टक्क्यांपेक्षा जास्त महिला उमेदवारांनी केली नोंदणी