आजचा साक्षीदार | दिवसभरातील महत्वाच्या टॉप बातम्या : 25 जानेवारी 2023
⃣ महिला आयपीएलसाठी बीसीसीआयला 5 संघांसाठी मिळाली फ्रेंचायजी, संघांच्या लिलावातून बीसीसीआयला 4 हजार 669 कोटी रूपयांची झाली कमाई
2️⃣ मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या अनेक सेवा दुपारी अचानक बंद; आऊटलूक, गिटहब, टीम्स, अझुरे, लिंक्डइन न चालल्याने युजर्स वैतागले
3️⃣ देवेन भारती यांच्यासह राज्यातील चार पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, महाराष्ट्राला 74 पदकं
4️⃣ सलमान खानच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाचा टीझर रिलीज; अभिनेत्री पूजा हेगडे, दाक्षिणात्य अभिनेता व्यंकटेशही झळकणार
5️⃣ जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरु करण्याबाबत आम्ही नकारात्मक नाहीत; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहीती
6️⃣ शेअर मार्केट: आज सेन्सेक्स 773 अंकांच्या घसरणीसह 60,205.06 वर तर निफ्टी 226 अंकांच्या घसरणीसह 17,891.95 वर बंद
7️⃣ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात 38 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, 27 जानेवारी पंतप्रधान मार्गदर्शन करणार
8️⃣ ऑस्कर 2023 साठी 2 भारतीय डॉक्युमेंट्रींना नामांकन; ‘ऑल दॅट ब्रिथस’ आणि ‘द एलिफन्ट व्हिस्परर्स’ या डॉक्युमेंट्रीचा समावेश
9️⃣ तामिळनाडू येथे मंत्र्याची कार्यकर्त्यांवर दगडफेक, दुग्धविकास मंत्री एस. एम. नासर यांनी खुर्ची आणून देण्यात उशीर झाल्याने कार्यकर्त्यांना मारला दगड
🔟 गोलंदाज मोहम्मद सिराजची मोठी झेप, एकदिवसीय क्रमवारीत बनला नंबर 1 चा गोलंदाज, अनेक दिग्गजांना पछाडत 729 अंकांसह टॉपवर