आजचा साक्षीदार । ब्रेकिंग न्युज : १७ ऑगस्ट २०२१ पासून महाराष्ट्र राज्यात शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला ब्रेक.. । Maharashtra schools not to open from August 17, MVA govt postpones decision
शालेय शिक्षण विभागाने १७ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याच्या काढलेल्या जीआर ला महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकार ने स्थगिती दिली आहे. टास्क फोर्सच्या बैठकी नंतर शाळा संधर्भात हा निर्णय घेण्यात आला असून शाळा सुरु होण्यासाठी शासनाच्या नव्या आदेशाची वाट पाहावी लागणार आहे.
ह्या निर्णयाच्या बाबतीत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पुढील प्रतिक्रिया दिली आहे …
गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि आरोग्य सांभाळण्यासाठी निर्णय घेत आलो आहोत. टास्क फोर्सच्या बैठकीनंतर शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आलीय. टास्क फोर्स काय म्हणालं, या संदर्भातील माहिती घेणार असल्याची प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांनी दिली.
आजचा साक्षीदार । ब्रेकिंग न्युज : १७ ऑगस्ट २०२१ पासून महाराष्ट्र राज्यात शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला ब्रेक.. । Maharashtra schools not to open from August 17, MVA govt postpones decision