आज २७ सप्टेंबर विश्व पर्यटन दिना निमित्त यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्याची माहिती…आजचा साक्षीदार| Sakshidar

आज २७ सप्टेंबर विश्व पर्यटन दिनानिमित्त यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्याची ( Tipeshwar Wildlife Sanctuary Yavatmal) माहिती…आजचा साक्षीदार| Sakshidar

आजचा साक्षीदार| Sakshidar:- केळापूर व घाटंजी केळापूर व घाटंजी या तालुक्यांमध्ये 148.62 चौरस किलोमीटर क्षेत्रात टिपेश्वर अभयारण्य ( Tipeshwar Wildlife Sanctuary Yavatmal)पसरले आहे. वाघाच्या मोठ्या प्रमाणावरील संख्येमुळे हमखास व्याघ्र दर्शनासाठी पर्यटक येथे भेट देतात. अभयारण्य क्षेत्रात टिपेश्वर, मरेगाव आणि पिटापुंगरी अशी तीन गावे येतात.

इंग्रजांच्या काळातील एक छोटे विश्रामगृह येथे आहे. एक निसर्ग वाचन केंद्रही येथे सुरु करण्यात आले आहे. शुष्क पानगळीच्या या जंगलात वाघ, बिबट्या, रानमांजर, छोटे उदमांजर, खोकड, अस्वल, चौशिंगा, काळवीट, चितळ आदी अनेक वन्यजीवांनी आश्रय घेतला आहे. नाग, घोणस, धामण, अजगर, घोरपड हे सरपटणारे प्राणीही येथे आहेत. अंजन, आपटा, बहावा, बोर, बाभुळ, बेल, बिबा, चिंच, चंदन, धावडा, हिरडा, जांभूळ, खैर, साग, पळस, सालई आदी वृक्ष येथे दिसतात. शिवाय पाणकावळे, बगळे, घार, तितर, सुतार, मैना, नवरंग आदी सुमारे 160 जातींचे पक्षी येथे पाहायला मिळतात.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment