आझादी का अमृत महोत्सव, आंतरराष्ट्रीय दत्तक महिना, बाल हक्क सप्ताह निमित्ताने सिंदगी आणि कळमकोंडा येथे जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न
हिंगोली : जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या वतीने जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार आझादी का अमृत महोत्सव, आंतरराष्ट्रीय दत्तक महिना, बाल हक्क सप्ताह निमित्ताने कळमनुरी तालुक्यातील मौ. सिंदगी आणि कळमकोंडा येथे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी जिल्हा बाल संरक्षण कक्षातील बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे, कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित व सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे यांनी बालकांचे हक्क व योजना, बालकांच्या कायद्यांविषयी मार्गदर्शन केले.