आणीबाणीच्या काळात लढा देणाऱ्यांसाठी सन्मान योजना…

भंडारा, दि. 23 (आजचा साक्षीदार) : आणीबाणीच्या काळात लढा देणाऱ्यांसाठी सन्मान योजना जाहीर करण्यात आली असून ईच्छुकांनी अर्ज करावे असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.आहे सन 1975 ते 1977 मधील आणीबाणीच्या कालावधीत लढा देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान, यशोचित गौरव करण्यासाठी सुरू कलेली योजना दिनांक 31 जुलै 2020 रोजी बंद करण्यात आलेली होती ती योजना नव्याने करण्यात आली आहे.

आणीबाणीच्या काळात लढा देणाऱ्यांसाठी सन्मान योजना…

आणीबाणीच्या लढ्यामध्ये सहभाग घेतलेल्या व्यक्ती ज्यांनी यापूर्वी अर्ज केला नाही. त्यांनी विहित केलेल्या परिशिष्टातील शपथपत्रासह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करावेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नव्याने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 31 ऑक्टोंबर 2022 असा राहिल असे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी कळविले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment