आमदार पाडवींचा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी संवाद

अक्कलकुवा व अक्राणी मतदार संघाचे आमदार मा. आमशादादा पाडवी यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाला भेट

अक्कलकुवा अक्राणी मतदार संघाचे आमदार मा. आमशादादा पाडवी यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाला भेट

आजचा साक्षीदार दि. 27 जानेवारी 2025: अक्कलकुवा : अक्कलकुवा व अक्राणी मतदार संघाचे आमदार मा. आमशादादा पाडवी यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाला भेट दिली. ते 1996 पासून रेशन दुकानदार म्हणून कार्यरत आहेत, आणि त्यांचा जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

या भेटीत अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील रेशन दुकानदारांना मिनी बँक लायसन्स मिळावे, यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. यासाठी जिल्हा लीड बँक मॅनेजर श्री. सचिन गांगुर्डे यांना बोलावून इच्छुक दुकानदारांची यादी सादर करण्यात आली.

रेशन दुकानदारांना मिनी बँक लायसन्स मिळाल्यानंतर आर्थिक व्यवहार अधिक सुलभ होतील आणि तालुक्याच्या आर्थिक प्रगतीत हातभार लागेल. या प्रक्रियेत उर्वरित इच्छुक दुकानदारांनाही लायसन्स देण्यासाठी समन्वय साधण्याचे काम सुरू आहे. विशेषतः बँकेच्या अधिकाऱ्यांकडून हे लायसन्स देण्यात येत असून, जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय समन्वयाचे महत्त्वाचे कार्य करत आहे.

अक्कलकुवा व अक्राणी मतदार संघाचे आमदार मा. आमशादादा पाडवी यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाला भेट

मा. आमदार साहेबांच्या या पुढाकारामुळे स्थानिक स्तरावर नवा आदर्श निर्माण होईल, यात शंका नाही! आमच्या रेशन दुकानदार बांधवांसाठी हा एक सकारात्मक आणि भविष्य घडवणारा निर्णय आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment