IPL will resume in Dubai: BCCIIPL will resume in Dubai: BCCI

आयपीएलचा उर्वरित हंगाम यूएईमध्ये होणार, सप्टेंबर – ऑक्टोबर महिन्यात खेळवले जाणार सामने – राजीव शुक्ला
IPL will resume in Dubai: BCCI

सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या आयपीएल २०२१च्या उर्वरित सामन्यांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आयपीएलचा उर्वरित हंगाम यूएईत होणार असून सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यात हे सामने खेळवण्यात येतील. या महिन्यांत भारतातील पावसाळ्याचा विचार करता बीसीसीआयने उर्वरित हंगाम यूएईत हलवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती बीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली. कोरोनामुळे यंदाची आयपीएएल स्पर्धा २९ सामन्यांनंतर स्थगित करण्यात आली होती.

आयपीएलचा उर्वरित हंगाम यूएईमध्ये होणार, सप्टेंबर – ऑक्टोबर महिन्यात खेळवले जाणार सामने – राजीव शुक्ला IPL will resume in Dubai: BCCI

आज बीसीसीआयची विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये सदस्यांनी आयपीएल पुन्हा सुरू करण्यास एकमताने सहमती दर्शविली. बीसीसीआय’ टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन भारतातच करण्यासाठी उत्सुक आहे. येत्या १ जूनला होणारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) कार्यकारी परिषदेची बैठक निर्णायक ठरणार आहे; परंतु भारतामधील कोरोना महामारी ची स्थिती पाहून आणखी काही महिन्यांनी आढावा घेऊन निर्णय घ्यावा, अशी विनंती बीसीसीआयकडून करण्यात आली आहे.
IPL will resume in Dubai: BCCI

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *