आरोग्य विभागातील परीक्षा केंद्रावर कलम 144 लागू – नांदेड

Sakshidar.co.in | अत्यंत महत्वाच्या बातम्या । Important Breaking News

आरोग्य विभागातील परीक्षा केंद्रावर कलम 144 लागू – नांदेड

आरोग्य विभागातील गट –क व गट- ड पदभरतीची परीक्षा 25 व 26 सप्टेंबर रोजी 73 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांच्या आदेशानुसार फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे. परीक्षा केद्राच्या परिसरात बाहेरील व्यक्तीचा उपद्रव होवू नये आणि परीक्षा सुसंगत पार पाडण्याच्या दृष्टिने शनिवार 25 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 व रविवार 26 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परीसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन/एस.टी.डी/आय.एस.डी/भ्रमणध्वनी/फॅक्स/झेरॉक्स/आणि ध्वनीक्षेपक बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या शिवाय इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश देण्यात येणार नाही. असे आदेश जिल्हाप्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment