उत्तराखंड चारधाम यात्रेकरीता ऑनलाईन नोंदणी सुविधा सुरु

परभणी, दि.22 (आजचा साक्षीदार): उत्तराखंड येथे सुरु असलेल्या चारधाम यात्रेकरीता दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने उत्तराखंड राज्याच्या पर्यटन विभागाने दर्शनासाठी भाविकांसाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध केली आहे. या चारधाम यात्रेच्या ऑनलाईन नोंदणीकरीता registrationandtouristcare.uk.gov.in किंवा Tourist Care Uttarakhand (Android/IOS) या मोबाईल ॲपवर निशुल्क नोंदणी भाविकांना करता येणार आहे.

उत्तराखंड चारधाम यात्रेकरीता ऑनलाईन नोंदणी सुविधा सुरु

तसेच नोंदणीकरीता काही समस्या असल्यास टोल फ्री क्र. 01351384 हा क्रमांकाची देखील सुविधा सुरु करण्यात आली आहे. चारधाम यात्रेकरीता अनेक भाविक नोंदणी न करता जात आहे. त्यामुळे त्यांना दर्शनासाठी खुप वेळ वाट पाहावी लागत आहे. काही भाविक अनाधिकृत स्त्रोतांकडून नोंदणी करत असल्याने त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे भाविकांनी वरील अधिकृत वेबसाईटवरुनच दर्शनाची ऑनलाईन नोंदणी करुन उत्तराखंड येथील चारधाम यात्रा सुरु करावी असे आवाहन दिलीप जावळकर सचिव, उत्तराखंड राज्य यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment