उद्योजकता विकास केंद्राचे ब्युटी पार्लर प्रशिक्षण

उद्योजकता विकास केंद्राचे ब्युटी पार्लर प्रशिक्षण

उद्योजकता विकास केंद्राचे ब्युटी पार्लर प्रशिक्षण

वाशिम, दि. 11 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने सुशिक्षित बेरोजगार युवती व महिलांसाठी सर्वसाधारण योजना सन २०२३-२४ अंतर्गत सहशुल्क स्वरूपाच्या ब्युटीपार्लर (ब्युटी अँड वेलनेस)” वर आधारित तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ब्युटीपार्लर (ब्युटी अँड वेलनेस) प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी प्रशिक्षणार्थीं ब्युटीशियनचे व्यक्तिमत्व, हेअर अँड स्कीन केअर ज्यामध्ये हेअर कट, हेअर स्टाईल, हेअर वॉश, हेड मसाज मेहंदी, थ्रेडिंग, वॅक्सिंग, फेशिअल, मॅनिक्युअर, पेडीक्युअर, ब्लीच, फेस क्लीन अप, मेकअप, आदींविषयी थेअरी व प्रात्याक्षीक स्वरुपात प्रशिक्षण दिले जाणार आहे.

ब्युटीपार्लर (ब्युटी अँड वेलनेस) प्रशिक्षण हे प्रशिक्षण एक महिना कालावधीचे आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल. त्यामुळे प्रशिक्षणार्थींना स्वतःचे ब्युटीपार्लर सुरु करण्यास आर्थिक लाभ होणार आहे. ४० प्रशिक्षणार्थीची या कार्यक्रमासाठी निवड केली जाणार आहे. प्रशिक्षणार्थी हा किमान इयत्ता ७ वी पास किंवा पदवी/पदविका/आय.टी. आय. प्रमाणपत्र किंवा कौशल्यावर आधारित व्यावसायीक अभ्यासक्रम प्रमाणपत्रधारक असावा.

ब्युटीपार्लर (ब्युटी अँड वेलनेस) प्रशिक्षण प्रवेशासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या www.mced.co.in या पोर्टलवर ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे आवश्यक आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी शैक्षणिक कागदपत्रांसह शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, मागासवर्गीय असल्यास जातीचे प्रमाणपत्र, स्वतःचे नावे असलेले बँकखाते पासबुकची सत्यप्रत व दोन फोटो इत्यादी कागदपत्रांसद न्यु लुक ब्युटी क्लिनीक अँड प्रोफेशनल पार्लर, पारस प्लाझा तसेच कार्यक्रम आयोजन खुशाल रोकडे 7057968131 व पुरुषोत्तम ठोंबे 9822108023 यांच्याशी 20 मे 2023 पूर्वी संपर्क करावा.

ब्युटीपार्लर (ब्युटी अँड वेलनेस) प्रशिक्षण अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, काळे कॉम्प्लेक्स, काटा रोड वाशिम ०७२५२- २३२८३८ येथे संपर्क करावा. असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment