सोनई, दि. 23 (आजचा साक्षीदार) – मुळा सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्रातील व कॉमन झोनमधील सर्व ऊस उत्पादक सभासद व शेतकरी बंधूंना नम्र आवाहन करण्यात येते की, ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी येत्या 2022-23 गळीत हंगामासाठी कारखान्याच्या ऊस लागवड धोरणाप्रमाणे ऊस लागवड केलेली आहे/खोडवा राखला आहे परंतु सदर ऊसाच्या नोंदी अद्याप कारखान्याकडे दिलेल्या नाहीत त्या शेतकऱ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांच्या पूर्ततेसह कारखान्याच्या संबंधित गट ऑफिससी संपर्क करून ऊस नोंदी वेळेत देण्याचे सहकार्य करावे, ही विनंती.जेणेकरून कारखान्याच्या शेतकी खात्यास ऊस तोडणी प्रोग्रामचे नियोजन व्यवस्थित करणे सोयीस्कर होईल.

कृपया सहकार्य व्हावे, ही नम्र विनंती, कार्यकारी संचालक, मुळा सह. सा. का. लि. सोनई









