यवतमाळ, दि. 18 ऑगस्ट 2022 :- पुसद येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास जिल्हाधिकारी, अमोल येडगे यांनी आज भेट देवून प्रकल्प कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. पारधी विकास योजना, स्वाभिमान व सबळीकरण योजना, घरकुल योजना यांची तात्काळ अंमलबजावणी करुन गरजू आदिवासी व पारधी लाभार्थ्यांना लाभ देण्याबाबत निर्देश दिले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे व प्रकल्प कार्यालयाचे इतर अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
पुसद प्रकल्प कार्यालयात घेतला विविध योजनांचा आढावा

शासकीय योजनांचा लाभ गरजूंपर्यत पोहचवावा – जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी यांनी आदिवासी विकास प्रकल्पामार्फत राबविण्यात येणाऱ्या तसेच प्रकल्पांतर्गत आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविणे व शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश देण्याबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी प्रकल्प कार्यालय, शासकीय आश्रमशाळा व वसतीगृहे येथील भुसंपादन व बांधकामाबाबत आढावा जिल्हाधिकारी यांनी घेवून आवश्यक त्या सूचना दिल्या. जिल्हा वार्षिक आदिवासी योजनेंतर्गत कामांची अंमलबजावणी संबंधीत यंत्रणांकडुन व्यवस्थीतरित्या होत आहे किंवा नाही याची तपासणी करुन प्रकल्प अधिकारी स्तरावर याबाबत नियमित आढावा घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.