औंढा (ना) येथे अनुसूचित जमाती प्रवर्गातील युवकांसाठी मोफत दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम…

औंढा (ना) येथे अनुसूचित जमाती प्रवर्गातील युवकांसाठी मोफत दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम

उद्योग संचालनालय, उद्योग विभाग, महाराष्ट्र शासन पुरस्कृत जिल्हा उद्योग केंद्र, हिंगोली व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, हिंगोली ( एमसीईडी ) यांच्या वतीने औंढा (ना.) येथे अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील युवकांसाठी मोफत डेअरी दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक मुलांनी यासाठी फोटो , आधार कार्ड , बँक पासबुक व शाळा सोडल्याचा दाखला महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र , हिंगोली येथे जमा करुन आपल्या नांवाची नोंदणी करुन घ्यावी .

औंढा (ना) येथे अनुसूचित जमाती प्रवर्गातील युवकांसाठी मोफत दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम

मुख्यमंत्री रोजगार योजना, पंतप्रधान रोजगार योजना व शासनाच्या विविध योजनेच्या अनुदानासाठी या प्रमाणपत्राचा उपयोग करता येणार आहे. तसेच यामध्ये शासकीय, निमशासकीय संस्थांच्या कर्ज व अनुदान विषयक योजनेच्या माहितीबाबत मार्गदर्शन, उद्योग निवड, बाजारपेठ पाहणी, यशस्वी उद्योजकाचे गुण, संभाषण कौशल्य व व्यक्तीमत्व विकास, उद्योग व्यवस्थापन व प्रकल्प अहवालाची माहिती तसेच यशस्वी उद्योजकांचे व उद्योग अधिकारी यांचे मार्गदर्शन मिळणार आहे.

औंढा (ना) येथे अनुसूचित जमाती प्रवर्गातील युवकांसाठी मोफत दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम

प्रवेश मर्यादित असल्यामुळे आपला प्रवेश दि. 23 नोव्हेंबर, 2021 पर्यंत निश्चित करण्यात यावा. नांव नोंदणीसाठी विकास उंडाळ, कार्यक्रम समन्वयक, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ( एमसीईडी ) , दुसरा मजला प्रशासकीय इमारत , जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली . मो.नं. 9325282463 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शंकर पवार, प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र , हिंगोली ( एमसीईडी) यांनी केले आहे .

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment