कर्नाटक सरकार 8 दिवसात बसवणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा || Chatrapati Shivaji Maharaj statue in Karnataka

कर्नाटक सरकार 8 दिवसात बसवणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा  || Chatrapati Shivaji Maharaj statue in Karnataka


कर्नाटक सरकार 8 दिवसात बसवणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा  || Chatrapati Shivaji Maharaj statue in Karnataka

Shrirampur 24Tass : कर्नाटक प्रशासनाकडून 8 दिवसात परवानगी देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. जर 8 दिवसात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला नाही तर 9 व्या दिवशी समस्त मनगुत्ती गावकरी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणार असल्याचा निर्णय पोलीस प्रशासन, तहसीलदार, पंच मंडळी आणि मनगुत्ती गावच्या ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. (Chatrapati Shivaji Maharaj statue in Karnataka)

प्रकरण नेमके काय?

5 ऑगस्ट 2020 रोजी बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. गावातील एका गटाचा त्याला विरोध होता. यासाठी ग्रामपंचायीतीने परवानगी दिली होती, तरीहि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्यात आला. बेळगाव जिल्हा प्रशासना ने रात्रीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यावरून वातावरण तापले होते. मनगुत्ती गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले होते यामध्ये गावातील महिला, तरुण संख्येने गावातील चौकात जमले होते. पुतळा त्वरित बसवावा, महाराजांचा पुतळा बसवेपर्यंत मागे हटणार नाही अशी ग्रामस्थांची भूमिका होती.Chatrapati Shivaji Maharaj statue in Karnataka)

शिवसैनिकांचे आंदोलन

महाराष्ट्रात या घटनेचे चांगलेच पडसाद जागोजागी उमटले आहेत. औरंगाबाद, हिंगोली, नागपूरसह अनेक ठिकाणी आंदोलनं झाली व कर्नाटक सरकारचा निषेध केला. महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर कोल्हापुरातील शिवसैनिकांनी या घटनेचा निषेध करत आंदोलन केले. कर्नाटक सरकारची तिरडी करून दहन केलं. नागपुरात शिवसैनिकांनी महाल परिसरातील गांधी गेट जवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. (Chatrapati Shivaji Maharaj statue in Karnataka)

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment