वाशिम, दिनांक 03 – रोजी तालुका कारंजा जिल्हा वाशिम येथे डॉ.देशपांडे सर ADHS व DTO वाशिम व डॉ. किरण जाधव मॅडम (तालुका आरोग्य अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. गटविकास अधिकारी एस. पी. पडघन साहेब यांच्या अध्यक्षते खाली कारंजा तालुका समन्वय समितीची सभा संपन्न झाली.

सभेकरिता डॉ. भाऊसाहेब लहाने (वैद्यकीय अधीक्षक), श्री. टी. बी. जाधव (महिला व बालविकास अधिकारी), श्री. श्रीकांत माने (गटशिक्षणाधिकारी), श्री. विनोद श्रीराव (तालुका आरोग्य सहाय्यक), श्री शाम भाऊ सवाई (एनजीओ), श्री गायकवाड (तालुका समूह संघटक), श्री आर.जी. मुंदे, (तालुका विस्ताराधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली सभा संपन्न झाली. सदर सभेमध्ये LCDC & ACF मोहिमेविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.सभेचे संचालन श्री. खरतडे साहेब NMA यांनी केले. सभे करिता श्री एस.डी.जाधव PMW,श्री .निलेश पाटील STS, श्री.रवी बर्वे STLS हजर होते.