केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी! |Ban on Single Use Plastics .!
भारत देशातील वाढत्या प्लास्टिक प्रदूषणावर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. १ जुलै २०२२ पासून सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. सिंगल यूज प्लास्टिकची निर्मिती, विक्री, साठवण तसेच वाहूतक करण्यास या निर्णयानुसार बंदी असेल. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारणा नियम २०२१ जारी केला आहे. विस्तारित पॉलिस्टीरिन सह सिंगल यूज प्लास्टिकच्या उत्पादन, आयात, साठवण, वितरण, विक्री आणि वापरावर पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारणा नियम २०२१ नुसार बंदी असेल.
प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारणा नियम २०२१ नुसार बंदी नुसार कोणकोणत्या प्लास्टिक वस्तूंचा समावेश असेल ?
● यामध्ये प्लास्टिकच्या विविध वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.
● झेंडा, फुगे, आईसक्रीम आणि कँडीसाठी वापरत असलेल्या प्लास्टिकच्या काड्या, सजावटीसाठी वापरण्यात येणारे थर्माकॉल
● प्लेट्स, कप, ग्लासेस, स्वीट बॉक्स, इन्विटेशन कार्ड आणि सिगारेटच्या पॅकेटवरील प्लास्टिक चे रॅप अशा वस्तूंची निर्मिती करण्यासही बंदी असेल.
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी! |Ban on Single Use Plastics .!