कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी युवक युवतींनी 31 जानेवारीपर्यंत नोंदणी करावी

कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी युवक युवतींनी 31 जानेवारीपर्यंत नोंदणी करावी

कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी युवक युवतींनी 31 जानेवारीपर्यंत नोंदणी करावी

कोल्हापूर, दि. १९ जानेवारी (आजचा साक्षीदार) : कौशल्य विकास केंद्रांनी जिल्ह्यातील बेरोजगार युवक- युवतींना किमान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत दर्जेदार प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या रोजगार व स्वयंरोजगार निर्मितीवरही भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.


जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी संगीता खंदारे तसेच समिती सदस्य उपस्थित होते.

कौशल्य विकास केंद्रांनी युवकांच्या रोजगार, स्वयंरोजगारावर भर द्यावा – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणा दरम्यान शासकीय योजनांचा लाभ घेतलेले लाभार्थी, यशस्वी उद्योजकांच्या मुलाखती तसेच प्रोत्साहनपर व्याख्यानांवरही भर द्यावा. प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियानांतर्गत आयोजित कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक इच्छुक युवक-युवतींनी 31 जानेवारी पर्यंत गुगल फॉर्मद्वारे ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी केले.

प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत देण्यात येणारे प्रशिक्षण नि:शुल्क असून हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना सरकारमान्य प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार स्वयंरोजगारच्या संधी उमेदवारांना उपलब्ध होतील. जिल्ह्यातील 18 ते 45 वयोगटातील उमेदवारांनी कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ‘सी’ बिल्डींग, शासकीय निवासस्थान, विचारे माळ, कावळा नाका, कोल्हापूर, दूरध्वनी क्रमांक 0231-2545677 यावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment