गस्ती नौका भाडे तत्वावर देण्यासाठी संपर्क साधावा… सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, ठाणे
पालघर दि,9 ऑगस्ट 22 :महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अंतर्गत सागरी गस्तीसाठी 1ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधी साठी ठाणे व पालघर जिल्ह्याकरिता एक खाजगी नौका भाड्याने घेण्यासाठी शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे.

मासेमारी नौका सागरी गस्तीसाठी भाडेतत्वावर देऊ इच्छीत असलेल्या नौका मालकांनी दिनांक 12 ऑगस्ट 2022 पर्यंत सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, ठाणे, -पालघर कार्यालयात कार्यालयीन वेळेत 02525 – 252215 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, ठाणे यांनी केले आहे