गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार | शेतकऱ्यांनी गाळ काढण्यासाठी अर्ज करावे

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार | शेतकऱ्यांनी गाळ काढण्यासाठी अर्ज करावे

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार | शेतकऱ्यांनी गाळ काढण्यासाठी अर्ज करावे

वाशिम, दि. 12 : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानामुळे धरण/ तलावातील गाळ उपसून तो शेतात पसरविल्यास कृषी उत्पादनात वाढ होण्यासोबतच धरणाची/ तलावाची मुळ साठवण क्षमता पुर्नस्थापित होण्यास मदत होणार आहे. यासाठी ज्या गावाच्या परिसरात धरण/तलाव आहे आणि त्यामध्ये मोठया प्रमाणात गाळ आहे.

तो गाळ शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये टाकावयाचा असल्यास संबंधित गावच्या शेतकऱ्यांनी गाळ मिळण्यासाठीचा अर्ज संबंधित ग्रामपंचायतीकडे करावा. ग्रामपंचायतीने गाळ मागणाऱ्या शेतकऱ्यांची एकत्रित यादी संबंधित तालुक्याचे तहसिलदार किंवा उप जलसंधारण अधिकारी यांचेकडे सादर करावी. जे अल्पभूधारक शेतकरी असतील त्यांच्या शेतात अनुदानातून गाळ टाकण्यात येईल. जे मोठे शेतकरी आहेत त्यांना स्वखर्चाने तलावातील गाळाची उचल करावी लागेल.

तरी ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात गाळ टाकून पिकाची उत्पादकता वाढवायची आहे त्यांनी संबंधित ग्रामपंचायतीकडे रितसर अर्ज करुन गाळ मागणीची नोंदणी करावी. असे आवाहन मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष आकोसकर यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment